Mayra Vaikul news  esakal
मनोरंजन

Janmashtami: दहीहंडीला 'सेलिब्रेटी' म्हणून बोलावलं तर...चिमुरडी मायरा काय म्हणाली पाहा!

माझी तुझी रेशीमगाठ मधील छोट्याशा मायरानं साम टीव्हीवरील मुलाखतीनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

युगंधर ताजणे

Govinda Re Gopala News: 'माझी तुझी रेशीमगाठ' मधील छोट्याशा मायरानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिनं सांगितलेल्या गोष्टी नेटकऱ्यांना भावल्या आहेत. मायराचं बोलणं, (Marathi Entertainment News) तिचे हावभाव, तिच्या बोलण्यातील चुणूक याचं सोशल मीडियावर नेहमीच कौतूक होत असतं. ती आता मोठी (Majhi tujhi Reshimgath) सोशल मीडिया सेलिब्रेटी झाली आहे. टीव्ही मनोरंजन विश्वातील त्या प्रसिद्ध मालिकेत काम करताना तिनं हजारो प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.

मायरानं दहीहंडी आणि तिचं नातं याविषयी सांगितलं की, आई बाबा नेहमीच आमच्यासाठी दही हंडीचा उत्सव साजरा करायचे. मला आठवतंय घरात ते छोटीशी दही हंडी बांधायचे आणि माझा भाऊ ती फोडायचा. तेव्हा मी दोन वर्षांची होते. मी दही हंडीच्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये देखील जायचे. त्याची मजा काही वेगळीच असते. जेव्हापासून लॉकडाऊन सुरु झाले तेव्हा मी खूप बोअर झाले. मात्र मी तेव्हा सोशल मीडियावर आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो. मी आणि माझा भाऊ इंस्टा कसे वापरायचे हेही आम्ही शिकलो. साम टीव्हीवरील मुलाखतीमधून मायरानं वेगवेगळ्या गोष्टींवर भन्नाट उत्तरं दिली आहेत.

यावेळी मायरानं माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या सेटवरील धमाल गोष्टी सांगितल्या आहेत. मायराचा भाऊ सुद्धा मालिकेत येणार असल्याचं तिनं सांगितलंय. मराठी मनोरंजन विश्वात सध्याच्या घडीला लोकप्रिय असणारी मालिका म्हणून माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचे नाव घेता येईल. या मालिकेनं अल्पावधीत मोठा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. मायरानं सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असण्याबाबत सांगितलं की, आता लोकं ओळखतात, खूप खूप कौतूक करतात हे पाहून छान वाटतं. आपल्याला सगळे बघतात हे भारी आहे. असं मायरानं सांगितलं आहे.

गणपतीच्या वेळी देखील आम्ही जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी खास गाणी तयार केली आहेत. छान सजावट करणार आहोत. गणपतीच्या आधी माझे एक गाणे येणार आहे. असंही मायरानं यावेळी सांगितलं. मी अजुन कुठल्या इव्हेंटला काही गेलेली नाही. पण मला जायला आवडेल. दही हंडीच्या बाबत जरा भीती वाटते. कुणी बोलावलं तर नक्की दही हंडी फोडेल असं मायरानं सांगिलंय...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT