Javed Akhtar_Aryan Khan 
मनोरंजन

आर्यन खान प्रकरणावर जावेद अख्तर यांचं कठोर भाष्य; म्हणाले...

बॉलिवूडला अशी किंमत का मोजावी लागतेय याचं कारणंही त्यांनी सांगितलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : कॅडिलिया क्रूझ रेव्ह पार्टी अर्थात आर्यन खान प्रकरणावर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कठोर भाष्य केलं आहे. आर्यन खानवर ज्या प्रकारे कारवाई करण्यात आली त्यावरुन त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच बॉलिवूडला अशी किंमत का मोजावी लागतेय याची कारणंही सांगितली आहेत.

काय म्हणालेत जावेद अख्तर?

"एका बंदरावर (अदानी पोर्ट) एक १ अब्ज डॉलरचं कोकेन आढळून आलं तर दुसऱ्या एका ठिकाणी (क्रूझ) बाराशे लोक उपस्थित असताना त्यांच्याजवळ मिळून १ लाख ३० हजार रुपयांचं गांजा आढळतो. पण यामध्ये दुसऱ्या ठिकाणची बातमी मोठी राष्ट्रीय बातमी होते. पण १ अब्ज डॉलरच्या कोकेनच्या बातमीची मी हेडलाईनही पाहिली नाही. वर्तमानपत्रात पाचव्या-सहाव्या पानावर याबाबत छोटीशी बातमी येते. तसेच बंदराचं प्रशासनं म्हणतं की, आम्ही आता संबंधित देशातून या ठिकाणी जहाजचं येऊ देणार नाही. पण तुमच्या बंदरात जे सापडलंय त्यावर आधी काही सांगणार का? या सगळ्यावरुन हेच दिसून येतं की, फिल्म इंडस्ट्रीला आपल्या हायप्रोफाईल असण्याची किंमत मोजावी लागते आहे," असं जावेद अख्तर यांनी एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना म्हटलं.

आपण जेव्हा हायप्रोफाईल असता तेव्हा लोकांना तुम्हाला खाली ओढण्यात, तुमच्यावर दगड फेकण्यात, तुमच्यावर चिकलफेक करण्यात मजा येत असते. जर तुम्ही कोणीच नसाल तर कोणाला वेळ आहे तुमच्यावर त्यांनी दगड फेकण्यासाठी? असंही अख्तर यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought : लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांवरील खर्च कमी करा, दुष्काळग्रस्तांना मदत करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन

IND vs WI 1st ODI Live: कुलदीप यादवची 'दादागिरी'! वारंवार संघाबाहेर बसवणाऱ्यांना सडेतोड उत्तर, जस्टीन ग्रीव्ह्सच्या शतकाच्या जोरावर विंडीजची मोठी धावसंख्या

गडचिरोलीतील सूफी संत 'जिलानी सरकार' यांचे निधन; भाविकांमध्ये शोककळा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

छंदच बनला व्यवसाय! २१व्या वर्षी महिन्याभरात २.६४ कोटींची उलाढाल, तरुणाने असं काय केलं?

SCROLL FOR NEXT