Javed Akhtar Honored with padmapani lifetime achievement award at ajintha verul film festival SAKAL
मनोरंजन

Javed Akhtar: यंदाचा 'पद्मपाणी' जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर

जावेद अख्तर यांचा नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष सन्मान करण्यात येणार आहे

Devendra Jadhav

Ajintha Verul Film Festival News: जगभरातील अनेक मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवांच्या यादीत अजिंठा - वेरूळ चित्रपट महोत्वाचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. जगभरातले प्रेक्षक - समीक्षक या चित्रपट महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात.

अशातच नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल व प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम यांनी केली आहे.

बुधवार, दि. ०३ ते रविवार, दि. ०७ जानेवारी २०२४ या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.

पद्मपाणी पुरस्कार निवड समितीने श्रीयुत अख्तर यांच्या नावाची निवड केली असून या समितीत प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली, बेंगळुरू, ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर (मुंबई), प्रसिद्ध हिंदी कवी अशोक बाजपेयी (दिल्ली), फेस्टीव्हल डायरेक्टर अशोक राणे, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता.

पद्मपाणी पुरस्काराच्या निमित्ताने जावेद अख्तर यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लक्ष रुपये असा सन्मान मिळणार आहे.

पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात बुधवार दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तर महोत्सव पुढील पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे.

केंद्रीय सूचना एवं प्रसारण मंत्रालय - भारत सरकार, एनएफडीसी व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. नाथ स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (NSBT), अभ्युदय फाउंडेशन हे या महोत्सवाचे सहआयोजक आहेत. डेलीहंट डिजिटल पार्टनर आहेत, एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अकॅडमीक पार्टनर आहेत.

छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणाऱ्या या महोत्सवात मराठवाडा आणि महाराष्ट्रभरातील अधिकाधिक रसिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, सचिन मुळे, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे डायरेक्टर अशोक राणे, आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, शिव कदम, डॉ.श्रीरंग देशपांडे, प्रोझोनचे कमल सोनी, आकाश कागलीवाल, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. आशिष गाडेकर, डॉ.रेखा शेळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, प्रेरणा दळवी, डॉ.कैलास अंभुरे, नीना निकाळजे, निता पानसरे, सुबोध जाधव आदींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni ला वाटतेय भारतीयांच्या तंदुरुस्तीची चिंता; स्वतःच्या मुलीचं उदाहरण देत म्हणाला, माझी मुलगी... Video Viral

अर्जुनने पुराव्यानिशी कोर्टात उघड केला साक्षीचा खोटेपणा; "आता त्या तन्वीला पण.." प्रेक्षकांनी केली मागणी

Latest Maharashtra News Updates : रमी खेळण्याचा विषय का लांबवला जातोय मला कळत नाही- कृषीमंत्री कोकाटे

Nagpur: मुंबई लोकल ब्लास्ट प्रकरणी १९ वर्षे गजाआड, तुरुंगात राहून मिळवल्या २२ पदव्या; एमबीएसह ३ विषयात मास्टर्स; कोण आहे एहतेशाम?

Satej Patil Rahul Patil : राहुल पाटील काय भूमिका घेणार? सतेज पाटील यांची मनधरणी, ‘निष्ठावंत’च्या लोगोने समर्थकांची भावनीक साद

SCROLL FOR NEXT