jawan prevue trailer shah rukh khan first time bald look in jawan SAKAL
मनोरंजन

Jawan Prevue Shah Rukh Khan: टकलु असुनही हॅंडसम दिसतोय, शाहरुखच्या जवान 'बाल्ड' लुकवर जनता दिवानी

Jawan Prevue मध्ये शाहरुखचा रॉकींग अंदाज पुन्हा प्रेक्षकांना दिसतोय

Devendra Jadhav

Jawan Prevue Shah Rukh Khan Bald Look News: शाहरुख खानच्या जवान सिनेमाचा Prevue ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. शाहरुख खानचा दमदार अंदाज जवान मध्ये दिसतेय.

शाहरुख खानच्या जवानची उत्सुकता शिगेला आहे. शाहरुख खानचा Jawan Prevue आज सकाळी रिलीज झालाय.

Jawan Prevue मध्ये शाहरुखचा रॉकींग अंदाज पुन्हा प्रेक्षकांना दिसतोय. शाहरुखने Jawan Prevue निमित्ताने पहिल्यांदाच एक अशी गोष्ट केलीय, त्या गोष्टीची चर्चा आहे.

(jawan prevue trailer shah rukh khan first time bald look in jawan)

Jawan Prevue मध्ये दिसतोय Bald लुक

शाहरुखला मनोरंजन विश्वातील हॅंडसम अभिनेता म्हणुन ओळखलं जातं. कुछ कुछ होता है, स्वदेस, चक दे इंडीया अशा गाजलेल्या सिनेमात शाहरुखच्या अभिनयाची चर्चा झालीच.

शिवाय त्याच्या हेअरस्टाईलचं सुद्धा कौतुक झालं. पण Jawan Prevue मध्ये पहिल्यांदाच शाहरुखचा Bald Look दिसतोय.

एरवी असा लुक कोणीही सुपरस्टार अभिनेता करणार नाही. पण शाहरुखने हे धाडस दाखवलंय. आणि विशेष म्हणजे, हा लुक त्याच्या फॅन्सना आवडला आहे. शाहरुख जवान निमित्ताने पहिल्यांदाच अशा लुकमध्ये फॅन्सना भेटणार आहे.

Jawan Prevue Trailer:

ट्रेलर तीन भाषांमध्ये रिलीज करण्यात आला. तो हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होत आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर 2 मिनिटे 15 सेकंदांचा आहे.

जवान या चित्रपटात शाहरुख खान आणि नयनतारा मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत विजय सेतुपती, रिद्धी डोगरा, सुनील ग्रोव्हर हे कलाकारही आपल्या अभिनय करणार आहे.

पठाण या चित्रपटानंतर जगभरातील प्रेक्षकांच्या नजरा शाहरुख खानच्या जवानवर खिळल्या आहेत. त्यातच आता ट्रेलर रिलज झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Jawan Release Date:

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा प्रिव्ह्यू अॅक्शन पॅक आहे. प्रिव्ह्यूची सुरुवात शाहरुख खानच्या आवाजाने होते.

ज्यामध्ये तो म्हणतो, 'मी कोण आहे हे मला माहीत नाही, माझा कोणताही हेतू नाही. स्वतःला विचारा की मी पुण्य आहे की पाप आहे कारण मी देखील तू आहेस. तयार. नाव ऐकले असेल."

चित्रपटात शाहरुख अॅक्शन अवतरात दिसत आहे. त्यासोबत ट्रेलरमध्ये तुम्हाला दिपिकाही दिसेल. तिचा फायटिंग सीन जबरदस्त आहे. 7 सप्टेंबरला जवान रिलीज होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT