jawan sunil grover sells goggles near highway  SAKAL
मनोरंजन

Jawan Sunil Grover: जवान करोडो कमावतोय तर दुसरीकडे सिनेमातला अभिनेता रस्त्यावर गॉगल विकतोय, व्हिडीओ आला समोर

जवान मध्ये भुमिका गाजवणारा सुनिल ग्रोव्हर रस्त्यावर गॉगल विकताना दिसला

Devendra Jadhav

बॉलिवूड सिनेमा जवान सध्या बॉक्स ऑफीसवर गाजतोय. जवानला प्रेक्षकांचं तुफान प्रेम मिळतंय. जवानने बॉक्स ऑफीसवर ६०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे.

जवान एकीकडे करोडो रुपयांचा गल्ला जमवत आहे. तर दुसरीकडे जवानमधला एक कलाकार रस्त्यावर चष्मे विकताना दिसलाय. हा कलाकार म्हणजे सुनील ग्रोव्हर.

(jawan sunil grover sells goggles near highway)

सुनील ग्रोव्हर रस्त्याच्या कडेला एका विक्रेत्याकडे चष्मा विकताना दिसला

अष्टपैलू अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर काही सेकंदांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये सुनील पांढरा टी-शर्ट घालून काळ्या रंगाचे जॅकेट आणि हाफ पँट घालून रस्त्याच्या कडेला चष्मा विकताना दिसत आहे.

यादरम्यान सुनील अतिशय मजेशीर पद्धतीने चष्मा विकताना दिसत आहे. तर एक ग्राहक त्याच्याकडून चष्मा विकत घेतो. यानंतर दुसरा ग्राहक येतो आणि सुनील त्याच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे दाखवतो.

हा मजेदार व्हिडिओ पोस्ट करण्यासोबतच, अभिनेत्याने मोहम्मद रफीचे जुने गाणे "तेरी प्यारी प्यारी सूरत" बॅकग्राउंडमध्ये जोडले आहे. सुनीलने कॅप्शनमध्ये वाईट नजर, एक लिंबू आणि लाल मिरचीचा इमोजी देखील पोस्ट केला आहे.

सुनिल ग्रोव्हरची जवानमध्ये भुमिका

जवान सिनेमात सुनिल ग्रोव्हरने पोलीस ऑफीसरची भुमिका साकारलीय. या सिनेमात सुनिलने नयनतारा, शाहरुख खान सोबत काम केलंय. जवानमध्ये सुनिलने साकारलेली छोटीशी भुमिका सर्वांच्या लक्षात राहिली.

सुनिलच्या अभिनयाने त्याचे फॅन्स खुश झाले आहेत. सुनिलने याआधी कपिल शर्मा शोमध्ये काम केलंय. सुनिलच्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्या केलंय

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT