Mrunal Thakur Instagram
मनोरंजन

बॉलीवूड नावं मोठं, लक्षण खोटं: अभिनेत्री मृणालचा धक्कादायक खुलासा

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या 'जर्सी' (Jersey) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात तिची जोडी अभिनेता शाहिद कपूरसोबत (Shahid Kapoor) आहे. मृणाल ठाकूरने 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'सुपर 30' (Super 30) या चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात त्याच्या विरुद्ध हृतिक रोशन (Hritik Roshan) होता.

तसे, मृणालने तिच्या अभिनय कारकिर्दीला टीव्ही शो 'मुझसे कुछ कहते हैं...ये खामोशियां' (Muzse kuch kehte hein... yeh khamoshiyaan) पासून सुरुवात केली. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्रीने उघड केले की तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिच्याशी चांगले वागले गेले नाही.

Mrunal Thakur

ती म्हणाली, “जेव्हा मी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा मला योग्य वागणूक दिली गेली नाही. मी घरी आल्यावर रडायचे.

मी माझ्या पालकांना सांगितले की मला हे आवडत नाही. त्यावर त्यांनी मला समजावले, 'मृणाल, तू पुढच्या दहा वर्षांचा विचार कर, लोक तुझ्याकडे बघतील आणि तुझ्याकडून प्रेरणा घेतील की ही मुलगी हे करू शकते तर मीही करू शकतो'. यानंतर मृणाल पूर्णपणे तिच्या कामावर केंद्रित झाली.

Mrunal Thakur

याच मुलाखतीत मृणाल पुढे म्हणाली, 'मी माझ्या पालकांची खूप ऋणी आहे. माझ्यात जे नाही ते करायला त्यांनी मला शिकवलं. माझ्या आई-वडिलांनी सांगितले की मी कठोर परिश्रमाने काहीही साध्य करू शकतो. यासाठी मी माझ्या आई-वडिलांचे नेहमीच आभार मानते.

मृणाल तिच्या आगामी 'जर्सी' चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. हा चित्रपट आधी ३१ डिसेंबरला रिलीज (Release) होणार होता. पण आता निर्मात्यांनी कोरोनाच्या नवीन परिस्थितीचा हवाला देत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत निर्माते लवकरच घोषणा करणार आहेत.

Mrunal Thakur & Shahid Kapoor

'जर्सी' हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झालेल्या तेलुगू (Telgu) चित्रपटाचा अधिकृत रिमेक (Remake) आहे. याच नावाने हिंदीतही हा चित्रपट तयार झाला आहे. चित्रपटाची कथा एका क्रिकेटरभोवती (Cricket) फिरते. या कथेत क्रिकेटमध्ये घडणारे राजकारण आणि क्रिकेटपटूचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर शाहिद कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत आणि पंकज कपूर (Pankaj Kapoor) शाहिदच्या मार्गदर्शकाच्या (coach) भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मृणाल पहिल्यांदाच शाहिद कपूरसोबत काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT