jhimma 2 marathi movie foreign actor come india to watch movie hemant dhome viral post  SAKAL
मनोरंजन

Jhimma 2: सातासमुद्रापार झिम्मा २ बघायला आलाय खास पाहूणा, हेमंत ढोमे म्हणतो.. त्याला आपली भाषा

झिम्मा २ आज सगळीकडे रिलीज झालाय. त्यानिमित्ताने हेमंतची ही पोस्ट चर्चेत आहे

Devendra Jadhav

Jhimma 2 News: हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा २ आज संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झालाय. झिम्मा च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता झिम्मा २ ला सुद्धा प्रेक्षक तितकंच प्रेम देतील अशी सिनेमाच्या टीमला आशा आहे.

अशातच झिम्मा २ चा दिग्दर्शक हेमंत ढोमेने सोशल मीडियावर सिनेमाबद्दल खास पोस्ट केलीय जी चर्चेत आहे. झिम्मा २ बघायला सातासमुद्रापार एक खास पाहुणा आलाय. कोण आहे हा पाहुणा? जाणून घ्या

सातासमुद्रापार झिम्मा २ बघायला आलाय खास पाहुणा

झिम्मा २ सिनेमात खास भूमिका करणारा एक परदेशी अभिनेता खास सिनेमाच्या रिलीजनिमित्त भारतात आलाय. त्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमेने पोस्ट करुन लिहीलंय की,

"झिम्मा २ या आपल्या चित्रपटात अत्यंत महत्वाची भुमिका साकारणारा आमचा मित्र जॅक खास सातासमुद्रापार इकडे आलाय, आपल्या सिनेमासाठी तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी…
चित्रपटात त्याने साकारलेली भुमिका तुम्हाला नक्की आवडेल!"

हेमंत ढोमे पुढे लिहीतो, "त्याला आपली भाषा बऱ्यापैकी शिकवलीय…
तो अतिशय प्रेमाने म्हणतो..
“म्हला मॅजा ॲली”

पण मित्रा तू आल्यामुळे खरच खूप मजा आली! जॅक, अगदी शेवटच्या क्षणी हो म्हटल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! मला खात्री आहे की तुला महाराष्ट्रातून खूप प्रेम मिळेल."

झिम्मा 2 सुपरहिट होणार?

महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांना झिम्मा 2 ची उत्सुकता आहे. कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत हेमंत ढोमे दिग्दर्शित हा सिनेमा आज रिलीज झालाय.

या सिनेमात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर  यांच्या दमदार भुमिका आहेत. 'झिम्मा २'ची सफर २४ नोव्हेंबर घडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लक्ष्मीकांत बेर्डेंनी गाजवलेलं नाटक परत येणार; 'अबब विठोबा बोलू लागला’ मध्ये हास्यजत्रेतील अभिनेता साकारणार धम्माल पुजारी

Building Collapsed: मोठी घटना! तीन मजली घराचा भाग कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू, ११ कामगार ढिगाऱ्याखाली दबले

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक

SCROLL FOR NEXT