prakash jha bobby deol 
मनोरंजन

ब्रेकिंग: 'आश्रम' वेबसिरीज प्रकरणी बॉबी देओल आणि प्रकाश झा यांना कोर्टाने बजावली नोटीस

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- आश्रम वेबसिरीज सुरुवातीपासूनंच वादाच्या भोव-यात सापडली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून ते या वेबसिरीजच्या दुस-या भागापर्यंत. या वेबसिरीजमध्ये 'आश्रम'मध्ये महिलांचं होणारं शोषण दाखवलं गेलं आहे. या वेबसिरीजमधील काही बोल्ड दृश्यामुंळे देखील ही वादात सापडली होती. आता पुन्हा एकदा या वेबसिरीजवर टांगती तलवार पाहायला मिळतेय.   

जोधपूरमधून ही बातमी हाती येत आहे की 'आश्रम' वेबसिरीज प्रकरणी सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता बॉबी देओल आणि निर्माता प्रकाश झा यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणावर आता ११ जानेवारीला सुनावणी होणार असून दोघांना ११ जानेवारीपर्यंत कोर्टाच्या नोटीसला उत्तर द्यावं लागणार आहे.

आश्रम वेबसिरीजचा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर यातील कलाकारांवर आणि निर्मांत्यांवर धार्मिक भावनांना ठेस पोहोचवल्याचा आरोप लावला होता. याचा दुसरा भाग आल्यानंतरही तेच झालं. मात्र बॉबी देओल आणि प्रकाश झा यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. प्रकाश झा यांनी स्पष्ट केलं होतं की जनमानसांमध्ये घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तथ्यांवरंच ही वेबसिरीज बनवली आहे. तर बॉबीने सांगितलं होतं की धर्माच्या नावाखाली चूकीच्या गोष्टी करणा-यांवर ही वेबसिरीज आहे. 

'आश्रम' वेबसिरीज एमएक्स प्लेअरवर रिलीज केली गेली होती. या वेबसिरीजचा दुसरा भाग रिलीज झाल्यानंतर आता तर प्रेक्षकांना तिस-या भागाची उत्सुकता आहे. या सिरीजमध्ये पुढे काय होणार ही उत्सुकता ताणून ठेवल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र यांच्या वाटेतील या अडचणी पाहता प्रेक्षकांना पुढच्या भागासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असंच दिसतंय. 

jodhpur court issued notice to bobby deol and prakash jha in ashram web series case  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ महादेव कोळी समाजाचा लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT