मनोरंजन

जॅक स्पॅरोचा 'लाईफ टाइम अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड'ने सन्मान

युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या अभिनयानं जगभर प्रेक्षकवर्ग असलेल्या जॉनी डेपचा johnny depp आता मोठा गौरव होणार आहे. पायरेट्स ऑफ कॅरेबियन pirates of carribian चित्रपटामध्ये जॅक स्पॅरोची jack sparrow भूमिका साकारुन त्यानं आपल्या नावावर आगळ्या विक्रमाची नोंद केली आहे. जगभरात जॉनी डेपचा चाहतावर्ग आहे. त्याच्या हटक्या शैलीनं त्यानं मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. सोशल मीडियावर देखील त्याच्या फॅन फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. त्यानं आतापर्यत अनेक हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र जॅकन त्याला वेगळी ओळख मिळवून दिल्याचे दिसून आले आहे.

जॉनी डेपला आता लाईफ टाईम अॅचिव्हमेंट पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. आगामी 69 व्या सेन सेबेस्टियन इंटरनॅशनल पुरस्कारामध्ये त्याचा गौरव होणार आहे. द टूरिस्ट, ट्रान्सेंडर्स सारख्या चित्रपटांमधूनही त्याला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे. जगातील प्रभावशाली अभिनेत्यांच्या यादीत जॉनी डेपचाही समावेश असल्याचे दिसून आले आहे. जगभरात त्याचा चाहतावर्ग पसरला आहे.

सोशल मीडियावर जॉनीला 10 मिलियनपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. यावरुन त्याची लोकप्रियता कळून येते. गेल्या काही दिवसांपूर्वी तो चर्चेत आला होता. त्याचे कारण म्हणजे त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर त्याचे वाद चव्हाट्यावर आले होते. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा होती. यामुळे त्याला मोठ्या परिणामाला सामोरं जावं लागलं होतं. काही मोठ्या निर्मात्यांनी त्याला आपल्या चित्रपटांमधून काढून टाकल्याचेही दिसून आले. एम्बर हर्ड या त्याच्या पहिल्या पत्नीबरोबर झालेल्या वादाचा फटका त्याला बसला. आणि अनेक फ्रँचाईजनं त्याला टाळलं.

आता स्पेनमधील सेन सेबेस्टियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टमध्ये जॉनीचा समावेश केला जाणार आहे. सोमवारी त्याच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी त्या संस्थेनं सांगितलं की, जॉनी आजच्या घडीला आधूनिक सिनेमामधील एक प्रतिभावान अभिनेता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT