Sonu Kumar
Sonu Kumar Esakal
मनोरंजन

Patna Rap Tea l 'कच्चा बदाम'नंतर आता 'पक्की चाय'! व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर 'कच्चा बदाम' (Kaccha Badam) या गाण्याने खळबळ उडवून दिली आहे. तरूण-तरूणीसह जेष्ठांनी यावर रिल्स तयार केले आहेत. एवढेच नाही तर टांझानियाचा किल पाॅल यानेही या गाण्यावर रिल्स बनवले आहेत. रातोरात स्टार झालेला पश्चिम बंगालमधील (West Bengal)भुबन बडईकर (Bhuban Badyakar) याचे हे गाणे. जे तो शेंगदाणे विकत असताना म्हणतो. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या पाटणा (Patna) येथील एका चहावाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो रॅप (Rap Song) चहा बनवत आणि विकत गातो आहे. यात तो म्हणतो 'कच्चा बादाम' छोड़िए... आ गई 'पकी चाय'! नेमका काय आहे हा व्हिडिओ जाणून घेऊया.

गाण्यांमुळे आणि त्याच्या चहा बनवण्याच्या शैलीमुळेच त्याच्या गाड्यावर नेहमी गर्दी असते.

हा व्हिडिओ आहे पाटण्यातील सोनू कुमार (Sonu Kumar) याचा. जो चहा विक्रेता आहे. तो हातगाडीवर चहा विकतो. चहा पित त्याचा रॅप ऐकायला विशेषता याठिकाणी नागरीक येतात. सोनूचे पाटणातील मुसल्लापूर भागात 'मारियो रॅपर कल्चर चाय कॉफी शॉप' नावाच्या हातगाडीवर दुकान थाटले आहे. तो चहा बनवताना तसेच ग्राहकांना चहा देताना रॅप गाणी गातो. त्याच्या गाण्यांमुळे आणि त्याच्या चहा बनवण्याच्या शैलीमुळेच त्याच्या गाड्यावर नेहमी गर्दी असते.

सोनूच्या गाण्यांमुळे आणि त्याच्या चहा बनवण्याच्या शैलीमुळेच त्याच्या गाड्यावर नेहमी गर्दी असते.

नोकरी सोडून चहा विकतो

सोनू चहा विकण्याआधी एका कंपनीत खासगी नोकरी करायचा. पण त्याला वेळेवर पैसे मिळायचे नाहीत. म्हणून त्याने नोकरी सोडली आणि चहा विकण्यास सुरुवात केली. चहा विकता-विकता त्याने ग्राहकांचे मनोरंजन करण्यास सुरवात केली. चहाची चव आणि मनोरंजन यामुळे त्याच्या गाड्यावर हळूहळू गर्दी होऊ लागली. सोनू चहा विकता विकता रॅप मधून त्याची आपबिती सांगतो.

सोनूला मोठा रॅपर बनायचे आहे

सोनूला मोठा रॅपर स्टार बनण्याची इच्छा आहे. आर्थिक विवंचनेमुळे आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्याने चहाचे दुकान उघडले आहे. याठिकाणी तो आपली कला सादर करून मनोरंजनही करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT