Kacha Badam Song: एका रात्रीत 'कच्चा बदाम' देशभर व्हायरल

सोशल मीडियाच्या (social media) आधारे अनेकांनी लोकप्रियता मिळवली आहे.
kachcha badam song viral
kachcha badam song viral

Bengali Song Kacha Badam: सोशल मीडियाच्या (social media) आधारे अनेकांनी लोकप्रियता मिळवली आहे. सध्याच्या डिजिटलच्या जमान्यात सेलिब्रेटींना देखील सोशल मीडिया इन्फ्ल्युएसरची (social media influencer) मदत घ्यावी लागत आहे. आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी (movie pramotion) सध्य़ा ते नवनवा फंडा वापरताना दिसत आहे. सध्या सोशल मीडीयावर बदाम गायकाची हवा आहे. तो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेडिंगचाही विषय आहे. एका रात्रीमध्ये कच्चा बदामचा गायक साऱ्या देशाला माहिती झाला आहे. त्याच्या गाण्यावरुन इंस्टा व्हाय़रल्सची (insta reel) संख्याही वाढली आहे. त्यानं गायलेल्या गाण्याचे आणखी काही सोशल मीडिया इन्फ्लयुएंसर्सनं देखील कौतूक केले आहे.

एका विमान कंपनीच्या एअर होस्टेस उमा मीनाक्षी यांनी कच्चा बदाम विषयीचा ट्रेंड ट्राय केला आहे. त्यांनी त्यावर व्हिडिओही तयार केला आहे. त्या व्हिडिओला लाखोंच्या संख्येनं नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. मुळात हे गाणं बंगाली भाषेत आहे. सोशल मीडिया सारख्या मीडियमवर ते प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी बचपन का प्यार फेम सहदेवला (bachpan ka pyar) मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. त्याच्यासोबत प्रसिद्ध गायक बादशहानं देखील गाणं शुट केलं होतं.

kachcha badam song viral
भारताचं राष्ट्रगीत टांझानियाच्या भावंडांनी गायलं; Video Viral

बंगाली व्यक्ती रस्त्यावर शेंगा विकताना दिसत आहे. त्यानं त्याचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. तो कच्चा बदाम नावाचं गाणं गाताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे गाणं तिथल्या लोकल मीडियावर चर्चेत होत. मात्र ते सोशल मीडियावर आल्यानं काही वेळातच देशभरातल्या सोशल मीडियानं त्यांची दखल घेतली आहे. आणि कच्चा बदामचा गायक हा आता देशभरातल्या अनेकांच्या नजरेत आला आहे.

kachcha badam song viral
Doobey Viral: डूबे'ची क्रेझ, दीपिका सिद्धांतचा 'गहराइया'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com