KRK Tweet on Akshay Kumar  Esakal
मनोरंजन

KRK Tweet: 'अक्षय कुमारनं मला मारण्याची सुपारी दिली',अभिनेत्याचा गंभीर आरोप...

Vaishali Patil

KRK Tweet on Akshay Kumar : अभिनेता आणि स्वत:ला चित्रपट समीक्षक मानणारा कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके हा मनोरंजन विश्वातील एक असा व्यक्ती आहे जो स्वत: नेहमी असं काही ना काही करतो की चर्चेत राहतो. तो नेहमीच त्याच्या विधानांमुळे चर्चेत असतो. त्यांची विधाने अशी असतात की त्यामुळे तो अनेकदा अडचणीत येतात.

केआरके बद्दल बोलायच झालं तर तो नेहमीच त्याच्या ट्विटमुळे चर्चेत असतो. तो अनेक कलाकारांवर टिका देखील करत असतो.

त्यामुळे तो अडचणीत देखील सापडतो. आता तर त्याने कहर केला. त्याने बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षयवर असे काही आरोप केले की त्यामुळे पून्हा ते अडचणी येण्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केआरकेनं त्याच्या जीवाला धोका असल्याचे सांगितलं आहे.

केआरकेने आपल्या नव्या ट्विटद्वारे अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासे केले आहे. KRK च्या म्हणण्यानुसार अक्षय कुमार त्याला जीवे मारण्यासाठी सुपारी देतो. इतकच नाही तर अक्षयला तुरुंगातच त्याचा खून करायचा होता. पण तो बाहेर आला.

मात्र आता अक्षय कुमारनं पुन्हा एकदा त्याच्या नावाची सुपारी दिली असून त्याला तुरुंगात किंवा पोलीस ठाण्यात त्याचा खुन करण्याची योजना आखत असल्याचा आरोप त्याने केलं आहे.

केआरकेच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, बॉलिवूडमधील सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत त्याला फक्त अक्षय कुमार हाच एकमेव अपवाद असल्याच सांगितलं! त्यानेच मला तुरुंगात मारण्याची सुपारी दिली होती आणि मला अटक केली होती.

मी खुप भाग्यवान होतो म्हणुन तुरुंगातून बाहेर पडलो. तो पुन्हा मला पोलीस ठाण्यात किंवा तुरुंगात मारण्याची सुपारी देत ​​आहे.

मला काही झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी अक्षय कुमार असेल. माझ्या हत्येशी सलमान खान, शाहरुख खान आणि करण जोहर यांचा काहीही संबंध नाही.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये तो म्हणतो की, अक्षय कुमारच्या म्हणण्यानुसार मी त्याला कॅनेडियन कुमार म्हणू नये, तो कॅनेडियन नॅशनल असताना मी त्याला कॅनेडियन का म्हणू नये? त्याची कॅनडात करोडो रुपयांची मालमत्ता कधी? मी त्याला नक्कीच कॅनेडियन कुमार म्हणेन.

तो मला मारण्यासाठी त्याच्या शक्तीचा वापर करेल तर ठीक आहे. आता केआरके च्या या आरोपांवर अक्षयनं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

SCROLL FOR NEXT