Kangana Ranaut as Indira Gandhi in First Look of Emergency movie sakal
मनोरंजन

Emergency Teaser: कंगना साकारणार 'इंदिरा गांधी', 'एमरजन्सी'चा टीझर रिलीज..

'एमरजन्सी' या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौतने इंदिरा गांधींची भूमिका साकारली असून तिचा लुक पाहून चाहते अवाक झाले आहेत.

नीलेश अडसूळ

Emergency Teaser : kangana ranaut : बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. म्हणजे कंगना काही बोलली आणि त्यावर खळबळ उठली नाही असे क्वचितच होते. कंगनाच्या वादग्रस्त विधानामुळे अनेकदा मोठे वाद ही निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी आलेला तिचा धाकड सिनेमा बॉक्स ऑफिस वर कमाई करण्यास अयशस्वी ठरला. पण हार मानेल ती कंगना कसली. अवघ्या काही दिवसातच तिने नव्या चित्रपटाची घोषणा केली. तिच्या नव्या चित्रपटाचे नवा 'एमरजन्सी' असून या चित्रपटात कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे.

(Kangana Ranaut as Indira Gandhi in First Look of Emergency movie)

(Emergency) या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर कंगनाने सोशल मीडिया अकाऊंवर शेअर केले आहे. हा टीझर शेअर करुन तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'Presenting ‘Her’who was called ‘Sir’ .. म्हणजेच 'अशा स्त्रीची ही कहाणी आहे जिला लोक सर म्हणत होते..' टीझरच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डी. सी 1971 असं लिहिलेलं आहे. तर एमरजन्सी चित्रपटाचे कथा, दिग्दर्शन आणि निर्मितीही कंगनानेच केली आहे. चित्रपटाचा स्क्रिनप्ले आणि संवाद लेखन हे रितेश शाह यांनी केले आहे. कंगनाचा हा लुक समोर येताच तिला ओळखणे कठीण झाली. एका क्षणासाठी इंदिरा गांधी यांचीच आठवण चाहत्यांना झाली. या टीझरवर अनेकजन कमेंट करुन तिला शुभेच्छा देत आहेत.

हा चित्रपट इंडिया गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यातही चित्रपटाच्या नावावरून समजते की या चित्रपटाचा मूळ कथा ही देशावर आलेली आणीबाणी आणि इंदिरा गांधी यांनी त्यावेळी घेतलेले धाडसी निर्णय यावर साकारली आहे. हा चित्रपट नेमके काय घेऊन येणार याची अद्याप कल्पना नाही. कारण कंगना आजवर कायमच कॉँग्रेस विरोधी भूमिका घेत आली आहे. त्यामुळे या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. तर तिचा 'तेजस' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात कंगनाने भारतीय हवाई दलाच्या फायटर पायलटची भूमिका साकारली आहे. कंगनाने तिच्या 'मणिकर्णिका रिटर्न्स' आणि 'सीता - द इनकार्नेशन' या चित्रपटांचीहीघोषणा केली आहे. कंगनाचा 'टिकू वेड्स शेरू' हा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT