Kangana Ranaut And Karan Johar esakal
मनोरंजन

कंगनाचा करण जोहरवर निशाणा, 'हिंदीच्या डाऊनमार्केट'वर घेतली शाळा

कंगनाचा करण जोहरवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

करण जोहर आणि कंगना राणावत यांच्यातील वाद नवीन नाही. कंगना त्याच्यावर बाॅलीवूडमध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप लावला आहे. करणही अनेकदा कंगनावर निशाणा साधण्याची संधी सोडत नाही. आता कंगनानेही पुन्हा करणवर हल्लाबोल केला आहे. करण जोहरने (Karan Johar) आपले पुस्तक 'एन अनसूटेबल बाॅय'मध्ये लिहिले होते की तो आदित्य चोप्राला सहन करु शकत नव्हता. कारण ते हिंदीत बोलत असत. करण पुढे लिहितो की लहानपणी त्याला वाटत होते, की हिंदी डाऊनमार्केट आहे. करण आपल्या आईला म्हणत होता की त्याला आदित्य यांच्या घरी पाठवू नको. कारण ते फक्त हिंदीतच बोलतात. (Kangana Ranaut Criticize Karan Johar Over His Statement On Hindi Speaking)

कंगना राणावतने (Kangana Ranaut) एका पोर्टलवर प्रकाशित बातमीचे स्क्रिनशाॅट इन्स्टाग्रामवर शेअर केले. त्यात करण जोहरच्या वक्तव्याचा उल्लेख आहे. त्याबरोबर ती लिहिते, मी कोणत्याही व्यक्तीविरोधात लढत नसून मी मानसिकतेशी लढते. आणि बऱ्याच प्रमाणात छोट्या शहराचे हिंदी भाषक लोकांविरुद्ध या प्रकारच्या विचाराशी लढा दिला आहे.

कंगना आणि करणचा वाद 'काॅफी विथ करण' शोमध्ये समोर आला होता. कंगनाने कार्यक्रमात भाग घेतला होता. तिने त्यावेळी करणवर हल्लाबोल केला आणि नेपो किंगपासून ते चित्रपट माफियापर्यंत म्हणाली. कंगना सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट लिहून करणला पापा जो म्हणत आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP-Shiv Sena alliance in Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप अन् शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला जाहीर!

Guhagar-Vijaypur highway accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर तामखडी नजीक भीषण अपघात; एक जण ठार तर सहाजण जखमी

Akola Municipal Election : अकोल्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला; प्रचाराला वेग!

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT