kangna 
मनोरंजन

व्हिडिओ: कंगना रनौतने भावाच्या रिसेप्शनमध्ये पहाडी गाण्यांवर केला डान्स

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- अभिनेत्री कंगना रनौतचा भाऊ अक्षत रनौत गेल्या गुरुवारी १० नोव्हेंबरला राजस्थानमधील उदयपूर येथे विवाहबंधनात अडकला. कंगनाने भावाच्या लग्नातील अनेक अपडेट्स सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. आता कंगनाच्या वहीनीचा त्यांच्या घरी गृहप्रवेश झाला आहे. तेव्हा आता लग्नानंतर कंगना रनौतच्या भावाची रिसेप्शन पार्टी हिमाचलमध्ये आयोजित केली होती. ज्यामध्ये कंगनाने पुन्हा एकदा तिच्या हटके लूकने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं.

कंगनाने भावाच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्यात वेगवेगळे लूक केले होते आणि तिचे हे सगळे लूक चाहत्यांमध्ये प्रचंड ट्रेंड झाले होते. आता कंगनाने तिच्या भावाच्या रिसेप्शनमध्ये तिचा शानदार लूक केला होता. अक्षतच्या रिसेप्शनमध्ये कंगना पहाडी लूकमध्ये दिसून आली. तिने तिच्या या लूकचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये कंगना रनौत पूर्णपणे हिमाचलच्या पारंपरिक पहाडी लूकमध्ये दिसून आली. कंगनाने टोपीपासून ते शालपर्यंत असा हा पारंपरिक पोशाख केला होता. भाऊ अक्षत आणि वहिनी ऋतुसोबत ती पोज देताना दिसली. सोबतंच कंगनाने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पहाडी गाण्यांवर डान्स करतेय. तिने यात सांगितलंय की ती फोक म्युझिकची चाहती आहे.   

kangana ranaut looks beautiful in traditional pahadi look at brother akshat wedding reception  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

SCROLL FOR NEXT