kangna on puja bhatt
kangna on puja bhatt 
मनोरंजन

कंगना रनौत पूजा भट्टवर संतापली, म्हणाली 'सुशांत आणि रियामध्ये तुझे वडिल काय करत होते?'

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- बॉलीवूडमध्ये सध्या घराणेशाहीवरुन वाद सुरु आहे. याचदरम्यान बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने भट्ट कॅम्पवर निशाणा साधला आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या कंगनाने महेश भट्ट यांच्यावर सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अनेक आरोप केले आहेत. कंगनाने घराणेशाहीच्या मुद्द्याला भट्ट कॅम्प देखील जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. यावर पूजा भट्टने ट्विटरवर कंगनाच्या आरोपांना चांगलंच उत्तर दिलं होतं. तसंच भट्ट यांच्या विशेष फिल्म्सने कंगनाला लॉन्च केल्याचंही पूजाने यात म्हटलंय मात्र कंगनाने आता यावर तिचा संताप व्यक्त केला आहे.

पूजा भट्टने म्हटलं होतं की, त्यांच्या प्रोडक्शन हाऊसने कित्येक नवोदितांना लॉन्च केलं आहे ज्यामध्ये कंगना रनौतचा डेब्यु सिनेमा गँगस्टरचा देखील समावेश आहे. आता यावर कंगना रनौतच्या टीमकडून पूजा भट्टवर ट्विटच्या माध्यमातून अनेक प्रश्नांचा भडिमार केला गेला आहे. यात कंगनाच्या टीमने असं लिहिलं आहे की तुझे वडिल (महेश भट्ट) हे सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्तीच्या रिलेशनशिपमध्ये काय करत होते? 

कंगनाच्या टीमकडून असं उत्तर देण्यात आलं आहे की, गँगस्टरच्या वेळी तिच्याकडे दोन सिनेमांचे पर्याय होते. गँगस्टर सिनेमासाठी ऑडिशन देताना तिने महेश बाबूसोबतच्या पोकरी या साऊथ सिनेमासाठी देखील ऑडिशन दिली होती ज्याचं दिग्दर्शन साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक जग्गनाथ पुरी यांनी केलं होतं. 

कंगनाच्या म्हणण्यानुसार ती पोकरीसाठी सिलेक्ट झाली होती. मात्र तिने गँगस्टरची निवड केली कारण त्याचं शूटींग सुरु झालं होतं. कंगनाने हे देखील सांगितलं की, महेश भट्ट यांनी तिचा अपमान केला होता. ते तिला पागल म्हणाले होते आणि तिच्या मृत्युबाबत बोलले होते अगदी तसंच जसं त्यांनी सुशांतच्या मृत्युची भविष्यवाणी केली होती. 

पूजाने काय ट्विट केलं होतं?

पूजा भट्टने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं, भट्ट यांच्या प्रोडक्शन हाऊसने कित्येक नवीन कौशल्य, अभिनेते, संगीतकार आणि टेक्निशियन्सना संधी दिली आहे. पूजाने कंगनाला ग्रेट टॅलेंट म्हणत हे ही लिहिलं की भट्ट कॅम्पच्या विशेष फिल्म्स् या प्रोडक्शन हाऊसने गँगस्टर या सिनेमातून तिला लॉन्च केलं होतं आणि आज ती त्याच भट्ट कॅम्पवर घराणेशाहीचा आरोप लावत आहे.     

kangana ranaut slams pooja bhatt and mahesh bhatt after nepotism allegations on bhatt camp  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT