'ही' गोष्ट कळाल्यावर सुशांत ओक्साबोक्सी रडला होता, शेखर कपूर यांनी मुंबई पोलिसांकडे केला खुलासा

shekhar kapoor
shekhar kapoor

मुंबई- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत ३० जणांचे जबाब नोंदवून झाले आहेत. ६ जुलै रोजी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी बांद्रा येथे त्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर आता मुंबई पोलीस या प्रकरणात आणखी तपास करत आहेत. यादरम्यान दिग्दर्शक शेखर कपूर यांची देखील चौकशी होणार असल्याचं समोर येत होतं. मात्र शेखर कपूर सध्या उत्तराखंडमध्ये असल्याचं कळतंय. त्यामुळे शेखर यांनी  मुंबई पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर इमेल द्वारे दिली आहेत. मात्र असं असलं तरी देखील मुंबई पोलिसांनी शेखर यांना जबाब नोंदवण्यासाठी बांद्रा पोलीस स्टेशनलाच हजर राहावं लागेल. ते त्यांची समोरासमोर चौकशी करु इच्छितात असं सांगितल्याचं पोलिसांच्या सूत्रांकडून कळतंय.

दिग्दर्शक शेखर कपूर सध्या उत्तराखंड मध्ये आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बांद्रा पोलिस स्टेशन इथे हजर राहायला सांगितले आहे मात्र कपूर मुंबईत कधी येतील आणि त्यांची चौकशी कोणत्या तारखेला होणार ही माहिती अजुन समोर आलेली नाही. शेखर यांनी इमेल द्वारे दिलेल्या जबाबात असं म्हटलंय की, 'पानी' सिनेमाबाबत सुशांत खूप उत्सुक होता. माझ्यापेक्षाही जास्त तो या सिनेमात गुंतला होता.

२०१२-१३ मध्ये १५० कोटींचं बजेट असणा-या या सिनेमासंदर्भात त्यांनी यशराज फिल्म्सच्या आदित्य चोप्रा यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर २०१४ मध्ये हा सिनेमा यशराज बॅनरसोबत झळकणार हे ठरलं. यशराजने या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनसाठी ७-८ कोटी खर्च केल्याचंही त्यांनी सांगितलं. सुशांतच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या होत्या. ३ ते ४ वर्षात हा सिनेमा पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. सुशांत या सिनेमात गोरा नावाची भूमिका साकारणार होता. या भूमिकेसाठी तो जीवतोडून मेहनत करत होता. माझ्यासोबत या सिनेमाच्या प्रोडक्शनच्या ठिकाणीही तो येऊन बसायचा. विशेष म्हणजे 'पानी' या सिनेमासाठी त्याने अनेक मोठे प्रोजेक्ट नाकारले होते.

एकेदिवशी सिनेमाच्या कंटेटवरुन आदित्य चोप्रा आणि शेखर कपूर यांच्यात वाद झाले. आदित्य यांचे विचार वेगळे होते त्यामुळे हा सिनेमा यशराज बॅनरपासून वेगळा झाला आणि हा सिनेमा आता तयार होणार नाही हे निश्चित झालं. यानंतर त्यांनी अनेक प्रोडक्शन हाऊससोबत या सिनेमासंदर्भात चर्चा केली. पण कुणीही सुशांतला घेऊन सिनेमा करण्याला तयार झालं नाही. त्यांना प्रसिद्ध चेहरा हवा होता. सुशांतला घेऊन त्यांना रिस्क उचलायची नव्हती. 

याविषयी सुशांतची प्रतिक्रिया सांगताने त्यांनी लिहिलंय की, 'सुशांतला हा सिनेमा बनणार नाही हे कळाल्यावर तो पूर्णपणे कोसळला होता. त्यादिवशी संध्याकाळी तो माझ्याकडे आला आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवून ओक्साबोक्सी रडायला लागला. त्याला पाहून मीही स्वतःचं रडणं थांबवू शकलो नाही. हा सिनेमा बंद पडल्याचं कळताच त्याला खूप मोठा धक्का बसला होता. ज्यामुळे तो नैराश्यात गेला. मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न देखील केला पण माझ्यापेक्षा जास्त तो या सिनेमात गुंतला होता.'

यानंतर काही दिवसांनी मी लंडनला गेलो असल्याने माझं सुशांतसोबत काही बोलणं झालं नसल्याचं त्यांनी सांगितलंय. कालांतराने सुशांतने त्यांना सांगितले की त्याने यशराजसोबत करार तोडला आहे. इतकंच नाही तर इंडस्ट्रीमध्ये त्याच्यासोबत सावत्र वागणूक होत आहे. त्याच्या हातून चांगले सिनेमे काढून घेतले जात आहेत. असंही सुशांतने सांगितलं होतं.

मात्र गेल्या ६-७ महिन्यांपासून त्याच्याबरोबर माझा कोणताही संपर्क नसल्याचं शेखर कपूर यांनी स्पष्ट केलं. या सगळ्या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. शेखर यांनी केलेल्या खुलासाच्या आधारे आता अनेक बाबींचा पोलीस तपास करणार आहेत.   

sushant singh rajput case director shekhar kapur sends statement mumbai police e mail  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com