मनोरंजन

Virendra Babu: बलात्कार अन् ब्लॅकमेल केल्याप्रकरणी चित्रपट निर्मात्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कर्नाटक पोलिसांनी कन्नड चित्रपट अभिनेता-निर्माता वीरेंद्र बाबूला एका महिलेवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटक केली आहे.

Vaishali Patil

Kannada Producer Virendra Babu Arrested: कर्नाटक पोलिसांनी लोकप्रिय कन्नड चित्रपट निर्माते वीरेंद्र बाबूला अटक केली आहे. महिलेवर बलात्कार आणि गुन्ह्याचा व्हिडिओ लीक करण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याप्रकरणी ब्लॅकमेलिंग आणि लाखो रुपये, सोन्याच्या मौल्यवान वस्तू लुटल्याच्या आरोप त्याच्यावर आहे. ही घटना 2021 सालची आहे. या प्रकरणी कन्नड चित्रपट निर्मात्याला शनिवारी अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र बाबूने पीडितेकडे 15 लाख रुपयांची मागणी केली होती. तिने पैसे न दिल्यास तिचा व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली होती.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आधी निर्माता वीरेंद्र बाबूने तिच्याशी मैत्री केली. चित्रपटाची ऑफर देण्याच्या बहाण्याने तिला आपल्या घरी बोलावले.

ज्यावेळी पिडिता वीरेंद्रच्या घरी पोहोचली तेव्हा त्याने तिला कॉफी प्यायला दिली ज्यात त्याने गुंगीचे औषध टाकले. ती कॉफी प्यायल्याने पीडिता बेशुद्ध पडली आणि त्यावेळी वीरेंद्र बाबूने तिचा फायदा घेत व्हिडिओ रेकॉर्ड केला.

त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. व्हिडिओ लीक करण्यासाठी धमकी आरोपीने दिली. त्याने तिला ब्लॅकमेल करत 15 लाख रुपयांची मागणी केली.

ही घटना 2021 मध्ये घडली होती, परंतु पीडितेने पोलिसांत तक्रार केल्यावर ती उघडकीस आली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, सततच्या छळापासून वाचण्यासाठी तिने आरोपींच्या सर्व मागण्या पुर्ण केल्या . मात्र, 30 जुलै रोजी संबंधित चित्रपट निर्मात्याने तिला पुन्हा धमकी दिली.

आरोपीने पीडितेला शहरात बोलावून बंदुकीचा धाक दाखवून तिच्याकडील सोन्याचे मौल्यवान दागिने लुटले. त्यानंतर धमकी देत तिला रस्त्यावर फेकून देत घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेनेनंतर पिडिता घाबरली अन् तिने कोडीगेहल्ली पोलिसात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी पोलिसांनी आरोपीचा पेन ड्राईव्ह, मोबाईल फोन आणि लॅपटॉपही जप्त केला आहे.

आता आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान आरोपीवर याआधीही अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; तुमच्या शहरात आता किती भाव?

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT