karan johar pm modi
karan johar pm modi 
मनोरंजन

करण जोहरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत केली मोठी घोषणा

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- दिग्दर्शक करण जोहर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच एनसीबीने करणला चौकशीसाठी नोटीस देखील पाठवली होती. त्यामुळे सोशल मिडियावर करण सातत्याने चर्चेत येतोय. तसंच सुशांत प्रकरणात होत असलेल्या ट्रोलिंगमुळे करणने सोशल मिडियापासून लांब राहणं पसंत केलं आहे. यादरम्यान करणने मात्र त्याचं काम सुरुच ठेवलं आहे. नुकतीच करणने ट्विटरच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा करण सगळ्यांच्या नजरेत आला आहे.

पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ मधील १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने करण जोहरने त्यावर आधारित एक एपिक सीरिज बनवण्याचा निर्णय घेतला आहे. #ChangeWithin या थीमवर ही सीरिज आधारित असणार आहे. या सीरिजवर करणसोबत सिने निर्माते राजकुमार संतोषी, दिनेश विजन आणि महावीर जैन हे देखील काम करणार आहेत. त्यामुळे या नव्या सीरिजची माहिती देण्यासाठी करणने ट्विट करत सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या पोस्टमध्ये टॅग केलं.

करणच्या या ट्विटने सोशल मिडियावर धुमाकुळ घातला आहे. ७ एपिसोडच्या या सिरीजमध्ये देश पराक्रम, संस्कृती आणि सभ्यता यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. 
करण जोहर हा खासकरुन त्याच्या बिग बजेट आणि महत्त्वकांक्षी प्रोजेक्टसाठी ओळखला जातो. नवीन वर्षात करणचे ‘ब्रह्मास्त्र’, ‘सूर्यवंशी’, ‘तख्त’, ‘जुग जुग जिओ’, ‘शहनशाह’ असे काही मोठे प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातंच आता या सिरीजची भर पडल्याने प्रेक्षकांमध्ये याबाबतही उत्सुकता आहे.  

karan johar big announcement of an epic series to celebrate 75 years of independence 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT