karan johar
karan johar 
मनोरंजन

सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोलिंगमुळे करण जोहरच्या मुलांना येतायेत जीवे मारण्याच्या धमक्या? रात्रंदिवस रडतोय करण..

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर करण जोहर घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होऊ लागला. करण ट्रोलिंगला पहिल्यांदाच सामना करत होता असं नाही याआधीही अनेकदा घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन करणला ट्रोल केलं गेलं होतं. मात्र सुशांतने अचानक एवढं मोठं पाऊल उचलल्याने सुशांतच्या चाहत्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे. सोशल मिडियावर होत असलेल्या ट्रोलिंगमुळे यावेळी मात्र करण चांगलाच घाबरला आहे. इतकंच नाही तर तो दिवसरात्र रडत असल्याचं त्याच्या जवळच्या एका मित्राने सांगितलं आहे. 

करण जोहरच्या एका जवळच्या मित्राने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीनुसार, करण सध्या वाईट परिस्थितीतून जात आहे. एवढ्या वर्षापासून तो ट्रोल होत आहे त्यामुळे ते झेलण्याची ताकद त्याच्याकडे आहे मात्र सुशांतच्या मृत्युमुळे लोक ज्याप्रकारे त्याच्यावर राग व्यक्त करत आहेत ते पाहून तो पूर्णपणे कोसळला आहे. 

त्याच्या मित्राने पुढे असंही सांगितलं की, करणच्या जवळचे सगळेच लोक सध्या या लोकांच्या निशाण्यावर आहेत.आणि यासाठी करण स्वःला दोषी समजत आहे. त्याच्या ३ वर्षांच्या लहान मुलांना देखील जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.मी जेव्हा जेव्हा त्याला फोन करतो तेव्हा तो ओक्साबोक्सी रडायला लागतो. तो रडत रडत हेच विचारतो ती मी असं काय केलं आहे ज्यामुळे मला हे सगळं भोगावं लागत आहे. 

करणच्या मित्राने सांगितलं की करणची ही परिस्थिती पाहून तो स्वतः खूप घाबरला आहे. तो काहीही बोलण्याच्या देखील मनस्थितीमध्ये नसल्याचं त्याने सांगितलंय. सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र त्याच्या या आत्महत्येमागचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. सोशल मिडियावर त्याच्या चाहत्यांनी त्याला न्याय मिळावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मोहीम राबवली आहे.

सोशल मिडियावर सुरु असलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यामुळे तसंच पसरत चाललेल्या नकारात्मक वातावरणामुळे सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, आयुष शर्मा सारख्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियापासून दूर राहणं पसंत केलं आहे.  

karan johar close friend revealed he is a broken man and keeps crying after hatred on sushant death

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT