Love Storiyaan
Love Storiyaan 
मनोरंजन

Love Storiyaan: सहा दिग्दर्शकांच्या सहा भन्नाट कथा; यंदाचा व्हॅलेंटाईन- डे असणार खास, लव्ह स्टोरीयां 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज!

सकाळ डिजिटल टीम

Love Storiyaan: दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) 'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये चाहत्यांना एक गिफ्ट देणार आहे. नुकतीच करणनं त्याच्या 'लव्ह स्टोरीयां' नावाच्या या चित्रपटातीची रिलीज डेट जाहीर केली आहे. या चित्रपटांच्या सीरिजमध्ये 6 उत्कृष्ट प्रेमकथा दाखवल्या जाणार आहेत. ज्या सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या आहे. करण जोहरने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन 'लव्ह स्टोरीयां'ची घोषणा केली आहे. कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लव्ह स्टोरीयां रिलीज होणार आहे? जाणून घेऊयात...

सहा दिग्दर्शकांच्या सहा भन्नाट कथा

करण जोहरच्या 'लव्ह स्टोरीयां' या चित्रपटात सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या सहा वेगवेगळे कथा दाखवण्यात येणार आहेत. अक्षय इंदिकर, अर्चना, कॉलिन डिकुन्हा, हार्दिक मेहता, शाझिया इक्बाल आणि विवेक सोनी या दिग्दर्शकांच्या कथा या चित्रपटात असणार आहेत. या चित्रपटाचा कार्यकारी निर्माते करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा हे आहेत.

कधी रिलीज होणार 'लव्ह स्टोरीयां'?

'लव्ह स्टोरीयां' हा चित्रपट व्हॅलेंटाईन- डेला म्हणजेच 14 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटात खऱ्या लव्ह स्टोरीज दाखवण्यात येणार आहे. लस्ट स्टोरीज आणि घोस्ट स्टोरीजनंतर आता करण जोहरच्या 'लव्ह स्टोरीयां' ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

'लव्ह स्टोरीयां'चं पोस्टर करण जोहरनं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. "भारत भर से सच्ची मोहब्बत की सच्ची कहानियाँ - इस वैलेंटाइन पर आपके लिए आ रही हैं!" असं कॅप्शन करणनं पोस्टरला दिलं आहे.

करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी प्रमुख भूमिका साकारली. तसेच त्याचा कॉफी विथ करण हा शो देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता करणच्या 'लव्ह स्टोरीयां' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT