When Karan Johar angry on kajol in front of Shahrukh Khan Esakal
मनोरंजन

Karan Johar: जेव्हा 'कुछ कुछ होता है' च्या सेटवर काजोलवर भडकला होता करण जोहर.. शाहरुखला करावी लागलेली मध्यस्थी

करण जोहरनं 'एक था लडका' या आपल्या आत्मचरित्रात काजोलवर भडकल्याचा तो किस्सा शेअर केला आहे.

प्रणाली मोरे

Karan Johar: बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांचे लाईफ खुल्या पुस्तकासारखं आहे. करण जोहर देखील यापैकी एक आहे. मग गोष्ट भले त्याच्या सिनेमाची असो की त्याच्या मैत्रीची तो नेहमी आयुष्य मनमोकळेपणानं जगताना दिसतो.

तुमच्यापैकी काहीजण कदाचित विचार करत असतील की तुम्हाला करण जोहरच्या लाईफविषयी सगळं माहित असेल. पणअजूनही त्याच्या लाईफमधले काही किस्से आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील.(Karan Johar: When Karan Johar angry on kajol in front of Shahrukh Khan)

आपल्या आयुष्याविषयी असाच एक किस्सा त्यानं आपलं आत्मचरित्र 'एक था लडका' मध्ये शेअर केला आहे. त्यानं एकदा काजोलला फटकारलं होतं याचा किस्सा त्यानं या पुस्तकात शेअर केला आहे. आता काजोलला करणनं फटकारलं हे ऐकून आपण सर्व हैराण झाला असाल .चला जाणून घेऊया यामागची कहाणी.

आपल्या आत्मचरित्रात करणनं करिअर,मैत्री आणि कुटुंबासंदर्भात अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यान 'कुछ कुछ होता है' सिनेमा संदर्भात अनेक गोष्टा लिहिल्या आहेत. वयाच्या २६ व्या वर्षी करणनं 'कुछ कुछ होता है' सिनेमाचं दिग्दर्शन करत इंडस्ट्रीत पदार्पण केलं.त्याला नेहमीच शांत चित्तानं काम करणं आवडतं. आपल्याला दुनियादारी कळत नाही असं तो म्हणाला.

करणचा साधेपणा पाहून काजोल नेहमीच त्याच्याविषयी काळजीत असायची. त्यामुळे तिनं करणला स्वतःमध्ये नेतृत्वाचे गुण संपादित करण्याचा सल्ला दिला. 'कुछ कुछ होता है' च्या शूटिंग दरम्यान काजोलनं करणला म्हटलं होतं की, ''तू खूप भोळा आहेस. दिग्दर्शक बनण्यासाठी लीडर बनावं लागेल. एक काम कर,जेव्हा सगळे लोक सेटवर असतील तेव्हा तू माझ्यावर जोरात ओरड''. काजोलचं बोलणं ऐकून करण म्हणाला की ''याने काय होईल?''

याचं उत्तर देताना काजोल म्हणाली,''यानं वाटेल की तू लीडर आहेस,जेव्हापण माझ्यावर कोणी ओरडतं तेव्हा मला खूप राग येतो''.

करणनं काजोलचा हा सल्ला ऐकला. तसंच केलं जसं काजोल म्हणालेली. सिनेमाच्या सेटवर करण,काजोलवर जोरात ओरडला. शाहरुख खान हे सगळं पाहून हैराण झाला. तेव्हा करणला थोडं थांबवत शाहरुख म्हणाला,''तू ओरडत का आहेस?''

तेव्हा करणनं शाहरुखला पूर्ण प्रकरण सांगितलं. करणचा राग पाहून काजोलला खूप हसू आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT