Karan Mehra and Nisha Rawal 
मनोरंजन

"निशाच्या वागण्यामुळे यायचे आत्महत्येचे विचार"

करण मेहराने निशावर केले शारीरिक शोषणाचे आरोप

स्वाती वेमूल

'ये रिश्ता क्या कहलाता है' Yeh Rishta Kya Kehlata Hai फेम अभिनेता करण मेहराने Karan Mehra पत्नी निशा रावलविरोधात Nisha Rawal शारीरिक शोषणाचे आरोप केले आहेत. "आमचं नातं इतकं ताणलं गेलं होतं की मला आत्महत्येचे विचार येऊ लागले होते", असं धक्कादायक विधान करणने केलं. अभिनेत्री निशा रावलने करणविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर करणला सोमवारी अटक झाली. जामिनावर सुटल्यानंतर करणने निशावर प्रत्यारोप केले आहेत. (Karan Mehra accuses Nisha Rawal of physical abuse said I became suicidal)

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला, "निशाचा स्वभाव नेहमीच आक्रमक होता आणि सुरुवातीला तिने माझं शारीरिक शोषणसुद्धा केलं. तिला राग आला तर ती हात-पाय मारू लागते. आपण काय करतोय हे तिला कळत नाही. वस्तू उचलून फेकत असते. वेळेनुसार तिच्या स्वभावात बदल होईल असं मला वाटलं होतं. मध्यंतरीच्या काळात तिच्यात थोडा बदल झाला होता, मात्र पुन्हा ती तसंच वागू लागली. गेल्या चार-पाच वर्षांपासून आमच्यातील गोष्टी फार वाईट झाल्या आहेत आणि मला अक्षरश: आत्महत्येचे विचार येत होते."

२०१२ मध्ये करण आणि निशाने लग्न केलं. गेल्या चौदा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखतात आणि त्यांना चार वर्षांचा कविश हा मुलगा आहे. ३१ मे रोजी करणला अटक झाल्यानंतर या दोघांमधील वाद माध्यमांसमोर आले. करण-निशाने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचंही समजतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT