Karisma Kapoor’s lookalike from Pakistan is breaking the internet  Google
मनोरंजन

पाकिस्तानची करिश्मा कपूर पाहिलीत का? नाव काय,करते काय,कशी आली चर्चेत?

सोशल मीडियावर या पाकिस्तानी करिश्मा कपूरचे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या भलतेचे पसंतीस उतरले आहेत.

प्रणाली मोरे

असं बोलतात की या जगात एक सारखेच दिसणारे सात लोक असतात. आणि हे खरं देखील आहे कारण आतापर्यंत आपण कितीतरी सेलिब्रिटींच्या ड्युप्लिकेट्सना पाहिलं आहे. काही चेहरे आणि त्यांचे हावभाव इतके एकसमान असतात की त्यांना पाहणारा प्रत्येकजण चक्रावून जाईल. सोशल मीडियावर एश्वर्या राय ते रणबीर कपूर,सैफ अली खान,शाहरुख खान,सलमान खान पर्यंत साऱ्यांचे ड्युप्लिकेट्स याआधी आपण पाहिले असतील अन् ते पाहून हैराणही झाले असाल. आता करिश्मा कपूरच्या(Karishma Kapoor) ड्युप्लिकेटनं सोशल मीडियावर वादळ आणलं आहे. फोटो आणि व्हिडीओ पाहून तर आपण बोलाल की अरे ही ड्युप्लिकेट नाही,तर Original करिश्मा कपूरच आहे.(Karisma Kapoor’s lookalike from Pakistan is breaking the internet)

करिश्मा कपूरच्या ड्युप्लिकेटचं नाव हिना खान आहे. आणि ती पाकिस्तानी आहे. सोशल मीडियावर हिना खानचे फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल झाले आहेत. करिश्मा कपूरची ही ड्युप्लिकेट काय करते? ती कधी आणि कशी चर्चेत आली?

हिना खान लंडनमध्ये राहणारी आहे,तिचा जन्म देखील लंडनाचाच आहे. ती मेडिकल स्टुडंट आहे. पण तिचं आजोळ पाकिस्तानात आहे. एका मुलाखतीत तिनं सांगितलं होतं की,''तिची आई पाकिस्तानी होती''. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की,''तिनं डबस्मॅश व्हिडीओ बनवण्यापासून सुरुवात केली होती. तिला अभिनयाचा छंद आहे,त्यामुळे तिनं मग टिक-टॉक व्हिडीओ बनवायला सुरुवात केली''.

हिना म्हणाली होती की,''तिला कधी असं वाटलंच नाही ती करिश्मा कपूरसारखी दिसते. लोकांनीच तिला करिश्मा कपूरच्या डायलॉगवर व्हिडीओ बनवण्याची सूचना केली होती. जेव्हा तिनं ते व्हिडीओ बनवले तेव्हा ते खूप व्हायरल झाले आणि प्रत्येकजण तिला करिश्मा कपूरची ड्युप्लिकेट बोलू लागला. आता तर लोकं तिला पाहिल्यावर दैवी चमत्कार असं देखील म्हणतात''.

हिना खानचे इन्स्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलॉइंग आहेत. तिचे आता १८० k फॉलोअर्स आहेत,आणि ते वेगानं वाढतही आहेत. आता करिश्मा कपूरनं हिना खानचे व्हिडीओ पाहिलेयत की नाही हे माहित नाही पण लोक मात्र करिश्माला हिना खानचे व्हिडीओ टॅग करताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT