मनोरंजन

करिश्‍माने करिना आणि तिच्या बद्दल सांगितले कॉलेज जीवनातील एक गुपीत  

सकाळ वृत्तसेवा


नवी दिल्ली ः बॉलीवूडमध्ये कपूर खानदानाचे मोठे वलय राहिले आहे. याच कपूर खानदानातील करिश्‍मा आणि करिना या दोघी सख्य्या बहिणी बॉलीवूडच्या दुनियेत नेहमी चर्चेत असतात. मात्र, त्यांच्या खासगी जीवनातील एक गोष्ट करिश्‍माने एका मुलाखतीमध्ये सांगितली आहे. ती ऐकली तर तुमचादेखील विश्‍वास बसणार नाही. करिश्‍माने शेअर केलेली ही गोष्ट मुंबईच्या लोकल प्रवासाबाबत आहे. 


करिश्‍माने मुलाखतीत सांगितले, की मी आणि करिना शाळेत असताना स्कूल बसने शाळेत जात होतो. मात्र, कॉलेजला जाताना आम्ही लोकल ट्रेनमधून प्रवास करायचो. या वेळी करिश्‍माने आई बबिता कपूर यांच्याबाबतदेखील काही गोष्टी सांगितल्या. आईने ज्या पद्धतीने आमचा सांभाळ केला, जे संस्कार केले, ते आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असल्याचे करिश्‍माने या वेळी सांगितले. 

दरम्यान, करिश्‍मा सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून, समाजमाध्यमांमधून चर्चेत असते; तर करिना कपूर सध्या चित्रपट क्षेत्रात आजही आघाडीची अभिनेत्री आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT