Kartik Aaryan fees hike after bhoolbhulaiyaa 2  Google
मनोरंजन

'भूलभूलैय्या' 2 च्या यशानंतर कार्तिक आर्यननं वाढवलं मानधन, चर्चा आहे की...

कार्तिक आर्यननं खूप कमी कालावधील बॉलीवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्यांमध्ये आपलं नाव कमावलं आहे.

प्रणाली मोरे

Kartik Aaryan: बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन आता टॉपच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो बरं का. आपल्या काही वर्षांच्या करिअरमध्येच त्यानं हे स्टारपद मिळवलं आहे. एकानंतर एक लागोपाठ हिट देणाऱ्या कार्तिक आर्यनची सध्या सगळेचजण प्रशंसा करताना दिसत आहेत. पण आता याचाच फायदा घेत हुशार कार्तिकनेही आपलं मानधन वाढवल्याची बातमी आहे. सध्या बॉलीवूडचे अनेक बडे सिनेमे बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरत आहेत. कोणत्याच सिनेमाच्या कथानकात दम दिसत नाही. पण कार्तिक आर्यनचा चार्म मात्र कायम आहे. त्याचे स्टार्स त्याला साथ देत आहेत. 'ए' कॅटॅगरीत असणाऱ्या बड्या स्टार्सच्या सिनेमांना देखील त्याचे सिनेमे मात देत आहेत.(Kartik Aaryan fees hike after bhoolbhulaiyaa 2)

कार्तिक आर्यनचा 'भूलभूलैय्या2' काही महिन्यांपूर्वीच रिलीज झाला होता. या सिनेमानं बॉक्सऑफिसवर जवळपास २०० करोडच्या आसपास कमाई केली. पण त्यामुळे कार्तिक आर्यनवर सिनेमाच्या यशाचा भलताच परिणाम झालेला दिसून येत आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार कार्तिक आर्यनने आपल्या मानधनात वाढ केल्याचं कळत आहे. कार्तिक आर्यन आता महागड्या कलाकारांमध्ये मोठ्या झोकात सामिल झाला आहे. कार्तिक आर्यनच्या याच स्टारडमनं भूलभूलैय्या हिट केला आहे. आणि म्हणूनच कार्तिक आर्यन आता निर्मात्यांकडे मोठ्या मानधनाची मागी करताना दिसत आहे. कोणताही निर्माता कार्तिककडे सिनेमा घेऊन गेला की त्याला कार्तिक मोठा मानधनाचा आकडा चार्ज करताना दिसत आहे.

पण इथे कार्तिक आर्यनचं म्हणणं आहे की,'भूलभूलैय्या २' ला मिळालेल्या यशानंतर त्याने आपलं मानधन वाढवलेलं नाही. पण एका न्यूज पोर्टलला मिळालेल्या वृत्तानुसार कार्तिक आर्यनने फ्रेडी सिनेमाच्या निर्मात्यांकडे डिमांड केली आहे की हा सिनेमा त्यांनी ओटीटीवर रिलीज करावा. कार्तिक आर्यनचे म्हणणे आहे की हा सिनेमा त्याच्या 'भूलभूलैय्या २' च्या बॉक्सऑफिसवरील रेकॉर्डवर परिणाम करण्याची शक्यता आहे,आणि त्याला तसं नको हवं आहे. त्या व्यतिरिक्त कार्तिक आर्यन 'शहजादा' सिनेमातही दिसणार आहे. हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात रिलीज केला जाणार आहे. हा अल्लू अर्जूनचा तेलुगू सिनेमा 'Als Vaikunthapuramaloo' या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. हा सिनेमा तेलुगू इंडस्ट्रीत २०२० साली रिलीज झाला होता.

पण एका इंग्रजी वेबसाईटच्या वृत्तानुसार बातमी समोर येतेय की अल्लू अर्जूनचा तेलुगू सिनेमाचा हिंदी रिमेक कार्तिकनं सध्या थांबवला आहे. त्याचं कारण बोललं जात आहे की अल्लू अरविंदला निर्माते साजिद नाडियादवाला आणि अनिल ठडानीचं सिनेमात ढवळाढवळ करणं आवडलेलं नाही. कार्तिक आर्यन आणि कृती सननचा 'शहजादा' सिनेमा मात्र २०२३ मध्ये रिलीज होणार हे पक्कं झालं आहे. याव्यतिरिक्त कार्तिक आर्यनजवळ 'कॅप्टन अमेरिका' आणि 'सत्यप्रेम की कथा' असे सिनेमे आहेत. त्यानं या सिनेमांवर काम करणं सुरू केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: द. आफ्रिकेच्या मारिझान कापने झुलन गोस्वामीचा विश्वविक्रम मोडला! सेमीफायनलमध्ये ५ विकेट्स घेत घडवला इतिहास

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT