मनोरंजन

KBC 13; सिक्युरिटी गार्डच्या मुलानं जिंकले 1 कोटी

'देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के' असं म्हटलं जातं..

युगंधर ताजणे

मुंबई - 'देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के' असं म्हटलं जातं. या उक्तीचा प्रत्यय कौन बनेगाच्या सेटवर आला आहे. त्यामध्ये त्या सिक्युरिटी गार्डच्या मुलानं चक्क एक कोटी रुपये जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. सध्या तो मुलगा सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. ज्या परिस्थितीतून तो आला त्यावरुन त्याच्यावर कौतूकाचा वर्षावही झाला आहे. केबीसीच्या 13 व्या सीझनमध्ये तो एपिसोड चर्चेत आला आहे. मध्यप्रदेश मधील छतरपूर जिल्ह्यातून आलेल्या एका सिक्युरिटी गार्डच्या मुलानं सर्वांना थक्क केलं आहे. त्याचे नाव साहिल असून तो सर्वांच्या आकर्षणाचा विषय झाला आहे.

साहिल आदित्यनं आता एक कोटी रुपये जिंकले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या केबीसीमध्ये त्याला सहभागी होण्याची संधी मिळाली. आणि त्या संधीचं त्यानं सोनं केलं आहे. मोठ्या आत्मविश्वासानं त्या शोमध्ये आपल्या बुद्धीची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांनी देखील त्याचं कौतूक केलं आहे. केबीसीच्या 13 व्या सीझनमध्ये एक कोटी रुपये कमवणारा साहिल हा दुसरा स्पर्धेक ठरला आहे. यावेळी साहिलत्या परिवाराविषयी सांगण्यात आले. त्यात त्याचे वडिल एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड असून साहिल स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. त्याची गेल्या काही वर्षांपासून युपीएससीची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामध्ये त्याला मोठं यश मिळवायचं आहे. सध्याच्या घडीला साहिल हा त्याच्या घरात एकटाच कमवता आहे. पैशांसाठी त्याला मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागत असल्याचे त्यानं सांगितले.

केबीसीमध्ये एक कोटी रुपये कमवणाऱ्या साहिलनं सांगितलं की, तो छतरपूर जिल्ह्यातील लवकूश नगरमध्ये आपल्या आई वडिलांसमवेत राहतो. साहिलचं घरही छोटंस आहे. त्याचा लहान भाऊ शाळेत शिकतोय. अशा परिस्थितीमध्ये साहिलनं अधिकारी व्हायचं स्वप्न पाहिलं आहे. त्यासाठी त्यानं काही वर्षांपासून मेहनत घ्यायला सुरुवातही केली आहे. आपण त्यात यशस्वी होऊ असा विश्वासही त्यानं व्यक्त केला आहे. मेकर्सनं साहिलच्या एक कोटी रुपये जिंकल्याचा प्रोमो व्हायरल केला आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला आहे.s

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena : “अरे ये ना...." सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेना नेत्यांमध्ये राडा, राऊत-म्हस्केंमध्ये जुंपली! अनिल देसाई तर... VIDEO पाहा

Fertilizer Rationing: युरिया, डीएपीचे होणार रेशनिंग; रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना ॲपवर नोंदणी बंधनकारक

'तारिणी'मध्ये ऑपरेशन तिरंगा! अभिनेत्रीचा लूकही बदलला, मालिकेत होणार गाजलेल्या अभिनेत्याची एंट्री; प्रोमो व्हायरल

Marathi News Live Updates : खड्डे, ट्राफिक आणि असुविधा, कंपन्या पुण्यातून बाहेर जाण्याच्या तयारीत, उद्योजकांची पत्रकार परिषद

Gokul Milk Sangh election : ‘गोकुळ’बाबत सर्कीट बेंचमध्ये मोठा निर्णय; अवसायनातील १९३ दूध संस्थांना मतदान अधिकार; हसन मुश्रीफ, सतेज पाटलांना थेट फायदा?

SCROLL FOR NEXT