Kedar Shinde shared emotional and thanks giving post after his 50th birthday sakal
मनोरंजन

Kedar Shinde: पन्नाशीची उमर गाठली.. वाढदिवासानंतर केदार शिंदे यांची भावनिक पोस्ट..

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला..

नीलेश अडसूळ

kedar shinde : दिग्दर्शक केदार शिंदे यांचा नुकताच वाढदिवस झाला. यानिमित्ताने त्यांच्यावर मनोरंजन विषवातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांच्या चाहत्यांनीही त्यांना लाखमोलाच्या शुभेच्छा दिल्या. हे प्रेम पाहून चाहते भारावून गेले. म्हणूनच त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

(Kedar Shinde shared emotional and thanks giving post after his 50th birthday)

महाराष्ट्रातील एक हरहुन्नरी दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. नाटक, मालिका असो किंवा चित्रपट. केदार शिंदे यांचा प्रॉजेक्ट आहे म्हणजे सगळ्यांचे डोळे तिथेच लागलेले असतात. केदार शिंदे हे नाव महाराष्ट्रातच नाही तर जगभरात पोहोचलेलं आहे. त्यांचे चित्रपट सातासमुद्रापार गाजले आहेत. अशा या दिग्दर्शकाचा नुकताच पन्नासावा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. याच प्रेमाबाबत केदार यांनी एक पोस्ट करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

या पोस्ट मध्ये केदार म्हणतात, ''१६ जानेवारी रोजी "पन्नाशीची उमर गाठली" तुमच्या असंख्य शुभेच्छा पोहोचल्या. असंच प्रेम सदैव राहो. RETURN GIFT लवकरच देईन. #महाराष्ट्रशाहीर आणि #बाईपणभारीदेवा हे माझे महत्वाकांक्षी चित्रपट लवकरच भेटीला येणार आहेत. कळावे. लोभ असावा.'' असे त्यांनी म्हंटले आहे.

हेही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

केदार शिंदे सध्या बरेच चर्चेत आहे. कारण सहा बहीणींची गोष्ट सांगणारा 'बाईपण देगा देवा' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. तर शाहीर साबळे यांच्या जीवनावर केदार लवकरच 'महाराष्ट्र शाहीर' हा बायोपिक करणार आहेत. 28 एप्रिल 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT