Maharashtra shahir movie : शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे (shahir sable) म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत.. प्रत्येकच गाणं हे माणसाच्या काळजात हात घालणारं. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांच्या पश्चात हा वारसा त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) पुढे नेत आहेत आणि आता तर शाहीर साबळे यांच्या जीवनावर ते चित्रपट करत आहेत. (Maharashtra Shahir Movie Updates) पुढच्या वर्षी म्हणजे २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटातील एका महत्वाच्या भूमिकेविषयी आज केदार शिंदे यांनी पोस्ट केली आहे. (kedar shinde shared post his daughter sana shinde played bhanumati sable role in maharashtra shahir movie)
'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांना होती. काही दिवसांपूर्वीच ही भूमिका अभिनेता अंकुश चौधरी करणार असल्याचा उलगडा झाला. अंकुशचा एक खास लुक देखील समोर आला आहे. त्यानंतर शाहीरांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका आणि संघर्षात भक्कम साथ असणाऱ्या त्यांच्या पत्नी 'भानुमती कृष्णकांत साबळे' यांची भूमिका कोण करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. केदार शिंदे यांनी नुकतीच एक पोस्ट शेयर करून याचा उलगडा केला आहे.
केदार शिंदे यांनी शेअर केलेल्या पोस्टर मध्ये त्यांची मुलगी सना शिंदे दिसत आहे. म्हणजे सना या चित्रपट 'भानुमती साबळे' ही अत्यंत महत्वाची भूमिका साकारणार आहे. नुकतेच सनाचा फोटो शेअर करून केदार शिंदे यांनी लिहिले होते की, तुझ्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू होत आहे. त्या शब्दांचा अर्थ आज समजला. सना शिंदे आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या आधी तिच्या वडीलांसोबत दिग्दर्शनाची धुरा सांभाळत होती. आता अभिनयातही तिने पाऊल टाकले आहे.
या पोस्ट सोबत केदार शिंदे यांनी एक सुंदर कॅप्शनही दिले आहे, ते म्हणतात.. 'आज ३ सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं.... सौ. भानुमती कृष्णराव साबळे. आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती 'सना केदार शिंदे'. पणजीच्या भूमिकेत पणती. शाहीरांचा हा झंझावाती जीवनपट 'महाराष्ट्र शाहीर' सादर करताना केदार शिंदे प्रोडक्शन सोबत आता आहे मराठी चित्रपट क्षेत्रातील महत्वाचं नाव 'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट!!' पुढच्या वर्षी २८ एप्रिल रोजी पुन्हा गर्जणार महाराष्ट्राच्या थिएटर्समध्ये अजय-अतुलचे सुमधुर संगीत!! महाराष्ट्र शाहीर, २८ एप्रिल २०२३.. जय महाराष्ट्र!''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.