Ketki Chitale_Sharad Pawar e sakal
मनोरंजन

केतकी चितळे पुन्हा बरळली; शरद पवारांविषयी केली आक्षेपार्ह पोस्ट

अत्यंत हीन दर्जाची टीका केल्यानं केतकी ट्रोलही झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे ही अधुनमधून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. आता तिनं पुन्हा एकदा असाच प्रकार केला असून यावेळी तिनं राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केली आहे. (Ketaki Chitale made offensive post about Sharad Pawar)

केतकीनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. अॅड. नितीन भावे नामक व्यक्तीची ही पोस्ट असून ती तिनं आपल्या वॉलवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर अत्यंत हीन दर्जाची टीका करण्यात आली आहे. यामध्ये "ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक" असे शब्द वापरण्यात आले आहेत.

केतकीच्या पोस्टचा जवाहर राठोडांच्या कवीतेशी संदर्भ

नुकतीच शरद पवार यांनी साताऱ्यात भाषणादरम्यान, कवी जवाहर राठोड यांची एक कविता वाचून दाखवली होती. कष्टकऱ्यांची व्यथा सांगणाऱ्या या कवितेत हिंदू देवदेवतांवर टीकात्मक भाष्य करण्यात आलं आहे. यावरुन शरद पवारांनी देव-देवतांचे बाप काढल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यावरुनच केतकीनं शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.

केतकी चितळे ही मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्री असून बऱ्याच काळापासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. पण अधूनमधून ती आपल्या सोशल मीडियावरुन वादग्रस्त विधानं करताना दिसून आली आहे. त्यामुळं तिला अनेकदा नेटकऱ्यांकडून ट्रोलही व्हावं लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT