मनोरंजन

तीन मित्रांची 'खो गए हम कहा'ची गोष्ट: सिद्धांत, अनन्याची भूमिका

युगंधर ताजणे

कोरोनानंतर मनोरंजन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहे. त्यापैकी एक म्हणजे बॉलीवूडमध्ये अनेक मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट आणि मालिका प्रदर्शित झाल्या आहेत. त्यातून नवनवीन कलाकार प्रेक्षकांसमोर येत आहेत. तरुण अभिनेत्यांनीही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास सुरुवात केलीय. त्यात अभिनेत्री सारा अली खान, अनन्या पांडे, सिद्धार्थ मल्होत्रा, आयुषमान खुराणा, नुसरत भरुचा, कियारा अडवाणी यांच्यासारख्या सेलिब्रेटींचा समावेश आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. लॉकडाऊनंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेक माध्यमांमध्ये बदल झाला आहे. तो प्रामुख्यानं वेबमालिका आणि चित्रपट यांच्यातील आहे.

सध्या सोशल मीडियावर तरुण, ताजी आणि प्रासंगिक, 'खो गए हम कहां' मुंबई शहरातील तीन मित्रांची 'डिजिटल' कहाणीची चर्चा सुरु आहे. याची पटकथा झोया अख्तर, अर्जुन वरैन सिंह, रीमा कागती यांनी लिहिली असून झोया अख्तर, रीमा कागती, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात तरुण आणि प्रतिभाशाली अभिनेते सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि आदर्श गौरव यांच्या मुख्य भूमिका असून अर्जुन वरैन सिंह याचा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न असणार आहे.

झोया अख्तरच्या 'गली बॉय'च्या तुफान यशानंतर सिद्धांतचे (एमसी शेर) नाव घराघरात पोहोचले असून त्याला आता अनन्या सोबत स्क्रीन शेअर करताना पाहायला चाहते उत्सुक आहेत. आदर्शला देखील यां दोघांसोबत एकत्र पाहणे, आनंददायक असणार आहे, त्याचे 'द व्हाइट टाइगर'मधल्या अभिनयासाठी खूप कौतुक झाले होते. एक्सेल एंटरटेनमेंट आणि टाइगर बेबी यांनी आज आपला आगामी थिएट्रिकल प्रोजेक्ट, 'खो गए हम कहाँ'ची घोषणा करत पोस्टर आणि व्हिडीओचे अनावरण केले. चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Latest Marathi News Live Update : नंदुरबार येथे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची उद्या सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

Nagpur Crime News : प्रेयसीने बोलणे बंद केल्याने पेटविले दुकान; आरोपीला अटक

Jasprit Bumrah : मुंबईचा खेळ संपला तरी... बुमराह ‘ऑन ड्युटी २४ तास’, वर्ल्ड कपच्या तोंडावर पण मिळणार नाही विश्रांती

SCROLL FOR NEXT