Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

Sensex-Nifty Today: देशांतर्गत शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स 286 अंकांनी घसरला आणि 73,225 च्या पातळीवर उघडला आहे. निफ्टीही 71 अंकांनी घसरला आणि 22,231 वर उघडला. बँक निफ्टी 120 अंकांपेक्षा जास्त घसरला आहे.
Share Market Opening
Share Market OpeningSakal

Share Market Opening Latest Update 8 May 2024 (Marathi News):

देशांतर्गत शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स 286 अंकांनी घसरला आणि 73,225 च्या पातळीवर उघडला आहे. निफ्टीही 71 अंकांनी घसरला आणि 22,231 वर उघडला. बँक निफ्टी 120 अंकांपेक्षा जास्त घसरला आहे. इंडिया व्हीआयएक्स देखील 2 टक्क्यांनी वाढत आहे. डॉ रेड्डीज लॅब, व्होल्टास, एचडीएफसी बँक सर्वाधिक घसरले.

Sensex Today
Sensex TodaySakal

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 10 शेअर्स वाढत आहेत आणि 20 शेअर्स घसरत आहेत. BSE वर, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वाधिक वाढले, तर L&T आणि Asian Paints आज सर्वाधिक घसरले होते. त्याचप्रमाणे, NSE वर, मारुती सुझुकी, कोल इंडिया सर्वाधिक तेजीत होते तर डॉ. रेड्डीज, ग्रासिम हे सर्वाधिक घसरले होते.

Nifty Today
Nifty TodaySakal

आज शेअर बाजारात निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप अनुक्रमे 0.33 टक्के आणि 0.21 टक्क्यांनी घसरले. क्षेत्रानुसार, निफ्टी रियल्टी सर्वात जास्त 1.38 टक्क्यांनी घसरला, त्यानंतर कन्झ्युमर ड्युरेबल्स 1.19 टक्क्यांनी घसरला आणि फार्मा 0.69 टक्क्यांनी घसरला, PSU बँक मात्र 0.84 टक्क्यांनी वधारले.

Share Market Opening
Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत
S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत काय?

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डाऊ जॉन्समध्ये सलग पाचव्या दिवशी वाढ होत आहे. 2024 मध्ये याने आतापर्यंतचा सर्वात मोठा तेजीचा कालावधी पाहिला आहे. भारतात कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे कमकुवत निकाल आणि निवडणुकीतील अनिश्चितता यामुळे शेअर बाजारावर परिणाम होत आहे.

अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत झाल्यानंतर सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढली आहे, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे शेअर बाजारावरही सकारात्मक परिणाम दिसू शकतो. 22137 ची पातळी निफ्टीसाठी खूप महत्त्वाची आहे आणि हा आधार तुटल्यास निफ्टीमध्ये मोठी घसरण होऊ शकते.

Share Market Opening
MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 45.1 हजार कोटी रुपयांची घसरण

7 मे 2024 रोजी, BSE वर सर्व कंपन्यांच्या शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 3,98,43,610.53 रुपयांवर होते. आज म्हणजेच 8 मे 2024 रोजी बाजार उघडताच, ते 3,97,98,490.07 रुपयांवर आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 45,120.46 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com