Khufiya Trailer Esakal
मनोरंजन

Khufiya Trailer: तुमच्यासाठी माणसं महत्वाची नाहीत, त्यांचा वापर करायचा अन्.... खुफियाचा ट्रेलर अंगावर काटा आणणारा!

Vaishali Patil

Khufiya Trailer: विशाल भारद्वाजचा आगामी स्पाय थ्रिलर चित्रपट 'खुफिया'चा धमाकेदार टीझर काही दिवसापुर्वी रिलिज झाला होता. टिझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडली होती मात्र आज निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'खूफिया'चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. खुफिया हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट असून तो OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलिज होणार आहे.

खुफिया या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर यात तब्बू, अली फजल आणि वामिका गब्बी यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाद्वारे तब्बू आता पुन्हा एकदा ओटीटीवर धमाकेदार एंट्री करणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलर नुसार तब्बू यात एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे जी एका मोहिमेवर आहे. या मोहिमेत तब्बूला भारताचे सिक्रेट विकणाऱ्या गुप्तहेराचा शोध घेण्याचं काम दिलं आहे.

तर दुसरीकडे अली फजल हा देव ची भूमिका साकारत आहे. मात्र रॉच्या टिमला देव हा देशद्रोही असल्याचा संशय आहे. विशाल भारद्वाजच्या 'खुफिया'मध्ये तुमचं मनोरंजन होणार आहे.

यात अली फजलचे काही संवाद मनाचे ठाव घेतात. तो म्हणतो की, 'माझी विचारसरणी या देशातील लोकांपेक्षा खूप पुढे आहे आणि हा माझा गुन्हा आहे, पण मी देशद्रोही नाही. मी कट्टर देशभक्त आहे.'

विशाल भारद्वाज दिग्दर्शित खुफिया हा चित्रपट अमर भूषण यांच्या एस्केप टू नोव्हेअर या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटातुन पहिल्यांदाच तब्बू आणि अली फजल यांची जोडी एकत्र दिसणार आहे. त्यांना पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif on Sunetra Pawar : सुनेत्रा पवार-प्रशांत किशोर भेटीवर हसन मुश्रीफांचं सूचक मौन; "मुंबईत काय घडलं माहिती नाही"

Bhira Hydroelectric Project : मुंबईच्या पाणीप्रश्नावर मोठा तोडगा! कोयना नव्हे, आता 'मुळशी'तून पश्चिमेकडे पाणी वळवण्याची मागणी; भिरा प्रकल्पातील 300 मेगावॉटमुळे होणार फायदा?

Gold Rate Today: बापरे! सोनं 84,000 हजारांनी महागलं; 4 दिवसांत मोठी वाढ; आता किती रुपयांना मिळतंय?

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर हसन मुश्रीफ काय म्हणाले

Katraj Dairy Milk Price: कात्रज डेअरीच्या दूध दरात वाढ; दुग्धजन्य पदार्थही महागणार... किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT