KIARA ADVANI SIDHARTH MALHOTRA
KIARA ADVANI SIDHARTH MALHOTRA  esakal
मनोरंजन

कियारासोबतच्या 'ब्रेक-अप'वर सिद्धार्थची पोस्ट व्हायरल

युगंधर ताजणे

Bollywood News: प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या शेरशाह चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या (Bollywood Actor) वेळी अजय देवगणचा भुज द प्राईड ऑफ इंडिया हा चित्रपट (Ajay Devgn) प्रदर्शित झाला होता. मात्र प्रेक्षकांनी त्याला नव्हे तर शेरशाहला प्रतिसाद दिला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला होता. तेव्हापासून (Kiara Advani) पुन्हा एकदा सिद्धार्थ आणि कियाराच्या अफेयरची चर्चा रंगु लागली. त्याला नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. मात्र आता एक मोठी बातमी समोर (entertainment News) आली आहे. ती म्हणजे सिद्धार्थ आणि कियाराच्या ब्रेकअप झाल्याची बातमी. त्यामुळे या दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. असं काय झालं की, या दोन्ही कलाकारांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हे आपण जाणून घेणार आहोत.

सध्या मनोरंजन विश्वातून अनेक सेलिब्रेटींच्या ब्रेक अपच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि समंथा यांचा तर काडीमोडच झाला आहे. आमिर खान आणि किरण राव यांचाही घटस्फोट झाल्याचे समोर आले आहे. यासगळ्यात सिद्धार्थ आणि कियाराच्या बातमीनं मात्र लक्ष वेधून घेतले आहे. स्टुडंट ऑफ द इयर पासून सिद्घार्थनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यामध्ये त्याच्या जोडीला आलिया भट्ट आणि वरुण धवनही होता. त्यानंतर सिद्धार्थनं अनेक चित्रपट केले मात्र त्याला काही यश मिळाले नाही. गेल्या वर्षी त्याच्या शेरशाहनं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत प्रेक्षकांची दाद मिळवली होती.

शेरशाहमध्ये सिद्धार्थ आणि कियाराची केमिस्ट्री कमालीची प्रभावी होती. दोन दिवसांपूर्वीच सिद्धार्थ - कियारामध्ये ब्रेक अप झाल्याची बातमी व्हायरल झाली आणि चाहत्यांना धक्का बसला. त्यानंतर सिद्धार्थची सोशल मीडियावर एक पोस्टही आली आहे. त्यात त्यानं कियारा सोबतच्या ब्रेक अपच्या बातम्यांवर त्या अफवा असल्याचे सांगितले आहे. कियाराचा भुलभलैय्या 2 नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. उद्या त्याचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. कियारा सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनध्ये व्यस्त आहे. त्यानिमित्तानं तिनं इंस्टावरुन एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून कियारा आणि सिद्धार्थ हे एकमेकांना डेट करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT