Tollywood News: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रदीप यांचे निधन |Tollywood Actor Kottayam Paradeep | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Pradeep
Tollywood News: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रदीप यांचे निधन

Tollywood News: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रदीप यांचे निधन

Tollywood : मनोरंजन विश्वाला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. (entertainment news) टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते कोट्टम प्रदीप (kottam pradeep) यांचे निधन झाले आहे. गेल्या आठवडाभरात मनोरंजन क्षेत्रातील तिसऱ्या मोठ्या सेलिब्रेटीचे (entertainment celebrity) निधन झाले आहे. ६ फेब्रुवारीला लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानं साऱ्या देशावर शोककळा पसरली होती. त्यानंतर काल प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून श्वसनाच्या आजारानं त्रस्त झाले होते. आणि आज प्रख्यात अभिनेते प्रदीप यांच्या जाण्यानं टॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.

प्रदीप यांच्या निधनाचे वृत्त कळताच टॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. 61 वर्षाच्या प्रदीप यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या होत्या. ते प्रेक्षकांच्या आवडीचे अभिनेते होते. त्यांचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. काल प्रदीप यांना हदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले आहे. अभिनेते कोट्टायम हे प्रदीप या नावानं प्रसिद्ध होते. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. प्रदीप यांची खासियत म्हणजे त्यांची संवादशैली. यामुळे ते प्रख्यात होते.

हेही वाचा: Video Viral: आज्जींने पहिल्यांदाच खाल्ला 'Pasta'; पाहा तिची Reaction

थिएटर आर्टिस्ट म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. 2001 मध्ये त्यांनी ई नाडू इन्नले वारे' चित्रपटांतून पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी 60 चित्रपटांमधून भूमिका करत प्रेक्षकांच्या मनात मोठे स्थान निर्माण केले होते. 'विन्नाईथांडी वारूवाया' च्या भूमिकेतून त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे त्यांचे सगळीकडे नाव झाले. प्रदीप यांच्या करिअरमधील ती सर्वात महत्वाची फिल्म होती.

Web Title: Tollywood Actor Kottayam Paradeep Passed Away 61

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..