Kiara Advani esakal
मनोरंजन

Kiara Advani: 'ये जो हलका हलका सुरुर है...' कियारा 'ट्रान्सपरंट' साडीत!

कियाराचा अंदाज हा नेहमीच तिच्या चाहत्यांना घायाळ करतो.

सकाळ डिजिटल टीम

Kiara Advani Transperent Look: कियाराचा अंदाज हा नेहमीच तिच्या चाहत्यांना घायाळ करतो. बॉलीवूडमधील सर्वाधिक बोल्ड अभिनेत्रींमध्ये कियाराच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. कियारा ही जशी तिच्या अनोख्या स्टाईलसाठी ओळखली जाते तशीच तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. शाहिद सोबत कबीर सिंगमध्ये तिनं साकारलेली प्रीती, तसेच वरुण धवनसोबत केलेली मेजर विक्रम मल्होत्राच्या पत्नीची भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष आवडीची आहे. कियारा आता ही एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे.

कियाराचा तो ग्लॅमरस अवतार तिच्या चाहत्यांना कमालीचा भावला आहे. त्यामुळे तिच्यावर त्यांनी कौतूकाचा वर्षावही केला आहे. कियारा ही मुंबईतल्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी तिच्या दिसण्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. कियाराचा व्हाईट साडीतील लूक हा भलताच बोल्ड आहे. चाहत्यांनी तिच्या त्या ट्रान्सपरंट साडीवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी देखील कियाराच्या फोटो आणि व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

कियाराचा तो ट्रान्सपरंट लूक नेटकऱ्यांना घायाळ करुन गेला आहे. हे त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून येते. काहींनी कियाराचं तोंडभरुन कौतूकही केलं आहे. कियारा तू खरी सौंदर्यवती आहेस, बॉलीवूडमध्ये सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींमध्ये तुझे नाव आग्रहानं घ्यावे लागेल. अशा प्रतिक्रिया तिला नेटकऱ्यांनी त्या व्हिडिओवरुन दिल्या आहेत. कियारानं त्या व्हाईट साडीसोबत स्लिव्हलेस ब्लाउजही परिधान केला आहे. जो तिच्यावर भलताच खुलून दिसत आहे.

कियाराची हटके स्टाईल आणि तिची फॅशन ही तिच्या चाहत्यांसाठी आगळी वेगळी पर्वणी असते. इंस्टावर कियाराला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कियाराचा अनोख्या अंदाजातील फोटो पडताच त्यावर कमेंट करण्यास चाहते उत्सुक असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT