Kiran Mane Facebook
मनोरंजन

सेटवर महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याने मानेंना काढलं; वाहिनीचा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

मुलगी झाली हो या मालिकेतून किरण माने यांना काढून टाकण्याचं काऱण स्टार प्रवाह वाहिनीने सविस्तर निवेदनाद्वारे प्रसिद्ध केलं आहे.

मुलगी झाली हो या मालिकेतून किरण माने यांना काढून टाकल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. याआधी किरण माने यांनी आपण राजकीय भूमिका घेतल्यानं काढून टाकल्याचा आरोप केला होता. त्यावर दिग्दर्शक आणि टीमने प्रतिक्रिया देताना किरण माने यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. आता स्टार प्रवाह वाहिनीने याबाबत निवदेन प्रसिद्ध केलं आहे.

वाहिनीकडून किरण माने यांनी केलेले आरोप फेटाळून लावताना म्हटलं आहे की, विलास पाटील यांची व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते किरण माने यांनी लावलेले आरोप तथ्यहिन आणि काल्पनिक आहेत. हे अत्यंत दुर्देवी आहे. तसंच त्यांना निर्मिती संस्थेनं मालिकेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

किरण माने यांच्याविरोधात त्यांच्याच सहकलाकारांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर माने यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. सह कलाकारांमध्ये महिला अभिनेत्रींशी गैरवर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून या कारणामुळेच प्रॉडक्शन हाऊसने त्यांना काढून टाकलं आहे. इतर कर्मचाऱ्यांकडूनही त्यांच्याबाबत आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्याबद्दल समज दिल्यानंतरही वर्तनात बदल न झाल्यानं अखेर कारवाई करण्यात आली. याबाबत प्रॉडक्शन हाऊसने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो असं वाहिनीने निवेदनात म्हटलं आहे.

गैरवर्तणुकीमुळेच बाहेरचा रस्ता ः दिग्दर्शक आणि टीम

किरण माने यांच्या गैरवर्तणुकीमुळेच त्यांना मालिकेतून काढण्यात आले आहे. उगीच या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया मुलगी झाली होमधील कलाकार आणि दिग्दर्शक यांनी दिली होती. दिग्दर्शक सचिन देव म्हणाले होते की, अभिनेते किरण माने यांची सेटवरील वागणूक बरोबर नव्हती. त्यांना प्राॅडक्शन हाऊसकडून तीन वेळा समज देण्यात आली होती. तरीही त्यांनी आपली वागणूक सुधारली नाही. त्यामुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आले. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली किंवा राजकीय मत सोशल मीडियावर मांडले म्हणून काढण्यात आलेले नाही.

अभिनेत्री शर्वाणी पिल्ले म्हणाली की,'किरण माने यांची बोलण्याची आणि वागण्याची पद्धत बरोबर नव्हती. आपल्यामुळेच ही मालिका चालते असा वारंवार टेंभा ते मिरवीत होते. त्यांच्या अशा गैरवर्तणुकीमुळेच त्यांना काढण्यात आले आहे. परंतु त्यांनी या गोष्टीला राजकीय रंग दिला आहे.' ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही शर्वाणी पिल्ले आणि सचिन देव यांच्या प्रतिक्रियेला दुजोरा दिला आहे. किरण माने यांच्या गैरवर्तणुकीमुळेच त्यांना काढण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

Pune Jewellery Market: पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुण्याच्या सराफा बाजारावर काय परिणाम झाला? व्यापारी काय म्हणताएत?

SCROLL FOR NEXT