Kiran Mane shared post his experience with asha workers fan love in jat taluka  sakal
मनोरंजन

Kiran Mane: कार्यक्रमाला किरण मानेच पाहिजे, म्हणून जत तालुक्यात आशा वर्कर्सने धरला हट्ट, अखेर..

अभिनेता म्हणून यासारखं दूसरं समाधान काय.. किरण माने यांनी शेयर केला भावनिक अनुभव..

नीलेश अडसूळ

Kiran Mane: गेली काही दिवस किरण माने बरेच चर्चेत आहेत, सुरवातीला वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे किरण माने सध्या बिग बॉस मुळे चर्चेत आहे. मुंबईत सह ग्रामीण भागात त्यांची प्रचंड हवा आहे.

यंदाच्या बिग बॉसच्या चौथ्या पर्वात किरण माने सहभागी झाले होते. वयाच्या ५२ व्या वर्षी साताऱ्यातल्या बच्चन किरण मानेंनी जबरदस्त खेळ खेळून बिग बॉस मराठी ४ मध्ये टॉप ३ पर्यंत मजल मारली. प्रेक्षकांच्या मनात त्यांनी वेगळंच स्थान निर्माण केलं

बिग बॉस मधून बाहेर आल्यावर किरण मानेंचा ठिकठिकाणी जाहीर सत्कार होतोय. गावागावातून त्यांना आमंत्रण येतंय.. अशाच एका गावात जाऊन तर थक्क झाले, भारावून गेले.. तोच अनुभव त्यांनी आज शेयर केला आहे.

माने लिहितात, ''माझ्या फक्त उपस्थितीनं या सावित्रीच्या लेकींच्या चेहर्‍यावर हास्य फुलणार असेल, तर ती माझी आयुष्यातली सगळ्यात मोठ्ठी कमाई आहे. परवा हा आनंद मी भरभरून घेतला.''

''किरण मानेच प्रमुख पाहुणे पाहिजेत' म्हणून जत तालुक्यातल्या सगळ्या 'आशा वर्कर्स'नी त्यांचा स्नेहमेळावा दोन महिने लांबणीवर टाकलावता. काॅम्रेड हणमंत कोळी यांच्यामार्फत माझा अक्षरश: पाठपुरावा करून-करून माझी तारीख घेतली.''

''हल्ली शुटिंग आणि सत्कार समारंभांसाठी खूप प्रवास होत असल्यामुळं मी जतला जाण्याचा थोडा कंटाळा करत होतो. पण तिथं पाऊल ठेवलं आणि सगळा थकवा तर गेलाच पण या बहिणींची डोंगराएवढी माया पाहून प्रचंड बळ मिळालं !''

''दारोदार फिरून रूग्णसेवा करणार्‍या - विशेषत: कोरोनाकाळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणार्‍या या आशा वर्कर्सनी स्वत:च्या आनंदासाठी वर्षातून एक दिवस काढावा.. त्यादिवशी मीच पाहिजे असा आग्रह धरावा... एक अभिनेता म्हणून यासारखं दूसरं समाधान काय असू शकतं? आनंदाचे डोही आनंदतरंग । आनंदचि अंग आनंदाचे ।।" अशा शब्दात किरण माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक पद अन् दोघांची नियुक्ती, फडणवीस, शिंदेंनी काढले वेगवेगळे आदेश; करायचं काय? प्रशासनासमोर मोठा प्रश्न

तो तुमचा प्रॉब्लेम‍! सचिन तेंडुलकर संतापला, Handshake Controversy वरून इंग्लंडच्या संघाला खडेबोल सुनावले

जो बायडन यांची मदत ते शिवरायांचे मुस्लिम मावळे, 'खालीद का शिवाजी' या सिनेमावर कोणते आरोप केले जात आहेत?

Elephants Padma Dhruva Menaka : कर्नाटकातील 'त्या' ३ हत्तींना तुर्तास दिलासा! पद्मा, ध्रुव आणि मेनकाची सुनावणी लांबणीवर

अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी मातंग संघटना आक्रमक; रस्त्यावर जोरजोरात आपटून घेतलं डोकं; कपाळाला मोठी दुखापत, रस्ता रक्तानं माखला

SCROLL FOR NEXT