Kiran Mane special post for Jigarbaz Leshpal jawalge who save girl in pune sadashiv peth incident SAKAL
मनोरंजन

Kiran Mane on Leshpal Jawalge: प्रोटीन पावडर खाऊन जीम करणाऱ्यांनो.. किरण मानेंनी केलं लेशपालचं कौतूक

बिग बॉस फेम अभिनेते किरण माने यांनी लेशपालचं कौतुक केलंय.

Devendra Jadhav

Kiran Mane on Leshpal Jawalge News: पुण्यात मंगळवारी घडलेल्या घटनेने महाराष्ट्र नव्हे तर देश हादरला. पुण्यातील तरुणीवर माथेफिरूने कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केला.

यात या माथेफिरुच्या तावडीतून त्या तरुणीला वाचवणाऱ्या जिगरबाज लेशपाल जवळगेचं कौतुक होतंय. देशभरातून लेशपालचं कौतुक होतंय. अशातच बिग बॉस फेम अभिनेते किरण माने यांनी लेशपालचं कौतुक केलंय.

(Kiran Mane special post for Jigarbaz Leshpal jawalge who save girl in pune sadashiv peth incident)

किरण माने यांनी सोशल मीडियावर लेशपालचे फोटो पोस्ट केलेत. या फोटोत लेशपालच्या मागे पुस्तकांचा ढीग दिसतोय. हा फोटो पोस्ट करून मानेंनी लेशपालचं कौतुक केलंय.

किरण माने लिहितात... ...प्रोटीन पावडरी घेऊन, इंजेक्शनं टोचून जीममध्ये जाऊन दंडाच्या बेंडकुळ्या फुगवणार्‍यांपेक्षा, पुस्तकं वाचून मेंदूत मुरवलेला माणूस जास्त शौर्यवान,

धैर्यवान आणि विद्वानही असतो, हे या भावानं दाखवून दिलं ! तुझ्या भावी वाटचालीस शुभेच्छा लेशपाल. अशी पोस्ट मानेंनी केलीय.

दरम्यान पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी घडलेल्या कोयता हल्ल्यातील तरुणीला MPSCचा अभ्यास करणाऱ्या लेशपाल जवळगे या तरुणानं वाचवलं होतं.

लेशपालच्या या धाडसाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. प्रशासनात जाऊन देशासाठी मोठं काम करु पाहणाऱ्या या लेशपालचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी मोठं कनेक्शन आहे.

लेशपाल आणि राहुल गांधी

ज्या ज्या राज्यांमधून ही यात्रा जात होती त्यांच्या या यात्रेत अनेक जण सहभागी होत होते. अशाच प्रकारे लेशपाल जवळगे हा देखील राहुल गांधींच्या या यात्रेत सहभागी झाला होता.

ही यात्रा काढण्यामागं देश जोडण्याचा जो विचार होता, तो लेशपालला भावला होता. त्यामुळेच त्यांनं राहुल गांधींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही लेशपालला १ लाखाचं बक्षीस जाहीर केलंय. एकूणच जिगरबाज लेशपालचं सगळीकडून कौतुक होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT