Koffee with Karan: Gauri Khan finally BREAKS SILENCE on Aryan Khan case sakal
मनोरंजन

आर्यनच्या ड्रग्ज प्रकरणावर होणार चर्चा.. ‘कॉफी विथ करण’मध्ये येणीर गौरी खान

मुलाच्या अटकेनंतर मीडियापासून दूर गेलेली गौरी खान प्रथमच या शोमध्ये अनेक खुलासे करणार आहे.

नीलेश अडसूळ

Koffee With Karan 7: सध्या बॉलीवुड विश्वातील अनेक गुपितं, अनेक किस्से बाहेर येत आहेत आणि त्याचं कारण आहे नुकताच सुरू झालेला 'कॉफी विथ करण' शो. नुकताच या शोचा सातवा सीजन 'कॉफी विथ करण 7' सुरू झाला आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) सुरू केलेला हा शो कायमच चर्चेत राहीला आहे. यंदाच्या पर्वातही अनेक बॉलीवुड कलाकारांची पोळखोल होणार आहे. नुकतीच या शो मध्ये अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिने हजेरी लावली. यावेळी तिने मुलाच्या अटकेवर म्हणजेच आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केल्याची माहिती समोर आली आहे.

(Koffee with Karan: Gauri Khan finally BREAKS SILENCE on Aryan Khan case)

करण जोहर होस्ट करत असलेल्या कॉफी विथ करणचा 7वा सीझन (Koffee With Karan 7) या शोमध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झाले आहे. नुकताच रणवीर सिंग आणि आलियाने आपल्या वैयक्तिक आयुषयाविषयी खुलासा केला. तर सारा आली खानही या मंचावर आली होती. आता आगामी भागात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी गौरी (Gauri Khan) अनेक खुलासे करणार आहे. एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार गौरी खान पहिल्यांदाच आपल्या मुळविषयी म्हणजेच आर्यन खानच्या (aryan khan) ड्रग्ज प्रकरणावर उघडपणे बोलताना दिसणार आहे.

आर्यन खानला गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी क्रुझवर ड्रग्ज नेल्याप्रकरणी (एनसीबी) पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला 28 दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. दरम्यान त्याची चौकशी झाल. त्यानंतर आर्यनची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच, नुकतेच न्यायालयाने त्याचा पासपोर्टही परत करण्याचेही आदेश एनसीबीला दिले आहेत. परंतु आतापर्यंत या प्रकरणावर शाहरुख खान किंवा गौरी या दोघांनीही मौन बाळगले होते. पण कॉफी विथ कारण मध्ये मात्र गौरी पहिल्यांदाच याबाबत बोलली असल्याची चर्चा आहे. करण गौरीला आपली मोठी बहीण मानतो. त्यामुळे या शोमध्ये ती मन मोकळं करेल असे दिसते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT