मनोरंजन

‘घुसखोरी’मागची दुसरी बाजू

युवराज यादव

स्थलांतर हा जीवनाचा, किंबहुना सृष्टीचाच एक स्थायीभाव आहे. अनेक पक्षी, प्राणी असे नियमित स्थलांतर करीत असतातच; मात्र मानवाच्या स्थलांतराला सीमांचे बंधन आले आहे. त्यामुळे एकीकडचे स्थलांतर दुसरीकडची बेकायदेशीर ‘घुसखोरी’ मानली जाते. खरे तर खुशीने आपली जन्मभूमी सोडून, परक्‍या जागेत आश्रितांचे जिणे कोण जगू पाहील... कोणी जीव वाचवण्यासाठी, कोणी पैशांसाठी, चांगले जीवन जगण्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी असा निर्णय घेत असतो. चांगल्या मार्गाने शक्‍य झाले नाही तर मग बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केला जातो. अशा प्रकारांसाठी अमेरिका आणि मेक्‍सिकोतील ‘घुसखोरी’च्या चर्चा सर्वश्रुतच आहेत. ‘नॉर्थलेस’ हा चित्रपट याच विषयावरील पटकथेवर बेतण्यात आला आहे. यंदाच्या कोल्हापूर चित्रपट महोत्सवाचा पडदा या मेक्‍सिकन चित्रपटाने उघडला.

अमेरिकेत जाऊन पैसा कमावण्याची आकांक्षा असलेल्या अनेक तरुणांपैकी अँडरेस हाही एक; मात्र यामागे आपल्या कुटुंबाला जपणे आणि कर्ज फेडणे हा त्याचा उद्देश. यासाठी तो मेक्‍सिकोच्या सीमेवरील जुआना या गावी येतो. अमेरिकेच्या हद्दीत घुसण्यासाठी तो एका एजंटाची मदत घेतो. तोवर तिथे छोटी-मोठी कामे करू लागतो. या दरम्यान तिथल्या इतर समस्यांचीही जाणीव त्याला होते. त्याच्याच घरात राहणाऱ्या दोन महिलांशी त्याची गट्टी जमते. त्यांचे पतीही अमेरिकेत गेले आहेत; मात्र त्यांना ते विसरले असून, तिथे दुसरा संसारही मांडल्याचे त्यांना कळते. अँडरेसची कथा मांडताना या महिलांचे आणि एकूण या विषयाचे भावविश्‍वही उलगडत जाते. अँडरेसला एका प्रयत्नात अपयश येते; मात्र नंतर महिला व एजंटाच्या मदतीने एक आगळी शक्‍कल लढवून तो अमेरिकेची वाट धरतो....

भारतासह अनेक देशांत घुसखोरी ही एक मोठी समस्या बनली आहे. अमेरिकेलाही शेजारच्या देशांतून अशा बेकायदेशीर घुसखोरीने ग्रासले आहे. याबाबतीत अमेरिकेचे कायदे खूप कडक आहेत; मात्र तरीही विविध मार्गांनी अशी घुसखोरी 
होतच असते. एकदा तिथे गेल्यानंतर पडेल ती कामे करून हे लोक पैसा कमावतात आणि मग तिथेच बस्तान 
बसवतात. 

हे बेकायदेशीर असले तरी यामागचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न ‘नॉर्थलेस’मध्ये दिग्दर्शक रिगोबेर्टो पेरेझॅनो यांनी केला आहे. २००९ च्या या चित्रपटाने अनेक महोत्सवांत हजेरी लावत पुरस्कारही मिळवले आहेत. संथपणे पुढे सरकत चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो व अपेक्षित परिणामही साधतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT