मनोरंजन

नेटका अन्‌ दमदार ‘सूर्यास्त’

संभाजी गंडमाळे

प्रकाश पाटील नावाचा दिग्दर्शक आणि राज्य नाट्य स्पर्धा हे एक अतूट समीकरणच. गेल्या वर्षी ‘अग्निदिव्य’च्या निमित्तानं सागर चौगले यांनी रंगमंचावरच कायमची एक्‍झिट घेतली आणि संपूर्ण टीमला मोठा मानसिक धक्काच बसला. पण, त्यातून पुरते सावरून प्रकाश पाटील यांनी शाहिरी पोवाडा कलामंचच्या माध्यमातून यंदाच्या स्पर्धेतही एका दमदार आणि नेटक्‍या प्रयोगाची अनुभूती कोल्हापूरकरांना दिली.

मुळात जयवंत दळवी यांचं ‘सूर्यास्त’ हे चाळीस वर्षांपूर्वीचं नाटक. अर्थात त्यांचं नाटक म्हणजे निर्भीडपणे स्पष्ट बोलणारं. दोनदा आपण निधन पावल्याची बातमी पसरल्यानंतर खुद्द त्यावरही त्यांनी आपला स्पष्टवक्तेपणा कायम ठेवला होता. कथा, कादंबरी, एकांकिका, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख, संपादन, साहित्यिक मुलाखती अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांची लेखणी लीलया वावरली. वास्तव जीवन, स्त्रीस्वातंत्र्य, वृद्धांचे एकाकी जीवन, स्त्रीमुक्ती, श्रीमंतांच्या विश्‍वातली अनैतिकता, लंपटपणा, सत्तास्पर्धा, भ्रष्टाचार या गोष्टींवर नाट्य पकडण्याचे सामर्थ्य असणारी त्यांची भाषाशैली सामान्य माणसालाही आपलीशी वाटते आणि ‘सूर्यास्त’ हे नाटक दळवींनी १९७८ मध्ये लिहिलं असलं; तरीही वर्तमानातील घटना-घडामोडींवर आजही तितक्‍याच परखडपणे भाष्य करते. काही संदर्भ बदलले असले, तरी काही समस्यांची मुळं अजूनही समाजात रुतलेलीच आहेत. नाटक जुनं की नवं यापेक्षा प्रेक्षकाला ते आपलं वाटतं, ही गोष्टसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. प्रकाश पाटील दिग्दर्शक म्हणून आणि ‘आप्पाजी’ म्हणूनही भारीच. त्याशिवाय ‘जनाई’, ‘संतराम’, ‘बाबूराव’ अशा सर्वच भूमिका चोख. एकूणच    आता इथली स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे. अजूनही अकरा प्रयोग बाकी आहेत. मात्र, एकूणच चुरस आणखीन वाढत जाणार हे स्पष्ट आहे.

पात्र परिचय 
 स्नेहा बिरांजे (जनाई), युवराज ओतारी (संतराम), दीपक खटावकर (बाबूराव), सोहन चव्हाण (बाळासाहेब), रोहित पोतनीस (गायकवाड), सत्यजित साळोखे (लालू), वर्षा अष्टेकर (आनंदी), धनश्री कोरगावकर (शालन), सिद्धार्थ बदी (भाऊराव), प्रकाश पाटील (आप्पाजी), रवी कदम, सुमित पाटणकर, समर्थ गोडवे, सचिन सुतार (सहकलाकार).

 दिग्दर्शक-प्रकाश पाटील
 नेपथ्य- रंगराव पाटील , युवराज पाटील, सुनील माने
 पार्श्‍वसंगीत- आदित्य खैरमोडे, विकास गुळवणी
 प्रकाशयोजना- संताजी पाटील
 वेशभूषा- शिवाजी गुरव, सुनीता कांडगावकर
 रंगभूषा- सखाराम चौगुले, शशिकांत यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

Khambatki Ghat : भररस्त्यात बस बंद पडल्याने पुणे-सातारा महामार्गावरील खांबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT