Konkona Sen  Esakal
मनोरंजन

Konkona Sen Sharma: 'माझ्या आईनं मला रामायण-महाभारत पाहू दिलं नाही..', अभिनेत्रीच वक्तव्य चर्चेत

कोंकणा म्हणाली की तिला घरी रामायण आणि महाभारत पाहण्याची परवानगी नव्हती.

Vaishali Patil

Konkona Sen Sharma: आपल्या जबरदस्त अभिनयाने कोंकणा सेन शर्माने लाखो चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. कोंकणाने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. तिने प्रत्येक भूमिकेतुन चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

कोंकणाला अभिनयाचा हा वारसा घरातूनच मिळाला आहे. कोंकणाची आई अपर्णा सेन एक उत्कृष्ट दिग्दर्शिका आहे. तर तिचे वडील मुकुल शर्मा हे प्रसिद्ध पत्रकार होते. कोंकणा नेहमी चर्चेत असते. त्यातच आता तिनं तिच्या बालपणाबद्दल आणि आईबद्दल काही खुलासे केले आहे.

कोंकणा म्हणाली की, तिला घरी रामायण आणि महाभारत पाहण्याची परवानगी नव्हती. तिनं मुलाखतीत सांगितलं त्याचबरोबर ती म्हणाली की, तिला अमेरिकन सोप ओपेरा पाहण्याची देखील परवानगी तिच्या आईनं दिली नव्हती.

यामागचं कारण सांगतांना कोंकणा सेन सांगते की, आईने तिला रामायण आणि महाभारत पाहण्याची परवानगी दिली नाही. कारण तिच्या आईची इच्छा होती की तिच्या मुलीने रामायण आणि महाभारत पाहण्याआधी ते वाचावं आणि तिच्या स्वतःच्या कल्पनेतून त्याचा अर्थ जाणून घ्यावा. कोंकणानं महाकाव्यांबद्दल दुसऱ्याच्या कल्पनेतून नव्हे तर स्वत:च्या कल्पनेतून जाणून घ्यावं, असं तिच्या आईला वाटत होतं.

याच मुलाखतीत कोंकणाने पुढे सांगितलं की, केवळ रामायण आणि महाभारतच नव्हे तर द बोल्ड अँड द ब्युटीफुल किंवा सांता बार्बरा सारखे अमेरिकन सोप देखील पाहण्याची परवानगी तिला मिळालेली नाही. तिच्या आईने तिला कधीही हिंदी आणि बंगाली चित्रपट पाहू दिले नाहीत.

वर्क फ्रंटवर, कोंकणा नुकत्याच रिलीज झालेल्या हिंदी अॅक्शन थ्रिलर कुत्तेमध्ये शेवटची दिसली होती. तिची 'लस्ट स्टोरी'ज देखील प्रदर्शित झाली. याशिवाय, ती लवकरच नेटफ्लिक्स डार्क कॉमेडी मालिका सूपमध्ये ती मनोज बाजपेयीसोबत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT