Kranti Redkar Video Esakal
मनोरंजन

Kranti Redkar: "आमच्या घरी गणपती बसत नाही..", क्रांती रेडकरने शेयर केला जुळ्या लेकींचा व्हिडिओ..होताय व्हायरल..

Vaishali Patil

Kranti Redkar Video: आज घरोघरी गणरायाचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. सर्वसामान्यांपासून तर मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या घरी देखील बाप्पा आला आहे. गणरायाच्या येण्यामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे.

एकीकडे गणराय वाजत गाजत आपल्या भक्ताच्या घरी आलाय मात्र काहींच्या घरी गणराय बसत नाही. असचं काहीस क्रांती रेडकर हिच्या घरी देखील झालं आहे.

क्रांती रेडकरच्या घरी गणपती बसत नाही त्यामुळे तिच्या घरी आजच्या दिवशी कसं वातावरण आहे. याचा एक व्हिडिओ क्रांतीने सोशल मीडियावर शेयर केला आहे. क्रांती रेडकरने एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंशी लग्न केलंय.

या जोडप्याला झिया आणि झायदा या दोन जुळ्या मुली आहेत. आता लहानमुलांना बाप्पाची किती ओढ असते हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तसचं काहीसं क्रांतीच्या लेकी छबिल आणि गोदो यांच्याबाबातही आहे.

छबिल आणि गोदोलाही बाप्पाचा लळा लागला आहे. मात्र घरी गणपती बसत नसल्याने क्रांतीच्या लेकींनी आता काय करताय हे तिनं शेयर केलेल्या व्हिडिओ दिसतय.

क्रांती रेडकरने शेयर केलेल्या व्हिडिओत तिच्या लेकी गणरायाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. यात त्या म्हणताय की, हॅप्पी बर्थ डे बाप्पा! गणू रडतोय कारण त्याला त्याच्या पालकांची आठवण येतय.

ते गणरायाला म्हणताय की दहा दिवसांनंतर तुझे आईवडिल तुला घ्यायला येतील. त्यानंतर दोघीही जय देव जय देव जय मंगलमूर्ती…ही आरती सुद्धा गाताय.

या व्हिडिओच्या कॅप्शमध्ये क्रांती लिहिते की, 'आमच्या घरी गणपती बसत नाही पण, लहान मुलांची आणि गणूची मैत्री काही औरच असते. ढोलकी शोच्या शूट दरम्यान ही बाप्पाची मूर्ती मला नेहा पाटीलने गिफ्ट केली होती.

आता आमच्या छबिल गोदोचा तो खास मित्र झाला आहे. त्या दोघींच्या आयुष्यातील तो एक अविभाज्य घटक आहे. गणपती बाप्पा मोरया!! तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!'

क्रांतीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी तिच्या लेकींच खुप कौतुक करताय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT