Kriti Sanon BREAKS silence on dating rumours with Prabhas  sakal
मनोरंजन

Kriti Sanon: माझं लग्न लावायच्या आत.. प्रभास सोबतच्या नात्यावर स्पष्टच बोलली क्रिती! म्हणाली..

अभिनेत्री क्रिती सनन बाहुबली फेम प्रभासच्या प्रेमात असल्याची चर्चा उठली आहे.

नीलेश अडसूळ

Kriti Sanon Relationship : गेली काही दिवस बॉलीवुडमध्ये एका कपलची जोरदार चर्चा आहे. ते कपल म्हणजे बॉलीवुड अभिनेत्री क्रिती सनन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास. प्रभासने क्रितीला प्रोपोस केलं, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. अशा अनेक चर्चा सध्या उठल्या आहेत. पण हे खरे आहे का, याबाबत नेमकी कुणालाच खात्रीशीर माहिती नव्हती, यावर अखेर क्रितीनेच मौन सोडलं आहे.

(Kriti Sanon BREAKS silence on dating rumours with Prabhas)

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननचा (Kriti Sanon) चा 'भेडिया' (Bhediya) सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण तिच्या चित्रपटापेक्षा ती वैयक्तिक आयुष्यामुळेच अधिक चर्चेत आली आहे. सध्या क्रिती आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबतच्या (Prabhas) अफेरच्या बऱ्याच चर्चा उठल्या आहेत. दरम्यान आता क्रितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या सर्व चर्चांवर खुलासा केला आहे.

क्रितीने इंस्टा स्टोरी शेअर करत लिहिलं आहे,"हे प्रेम नाही किंवा प्रमोशन देखील नाही. आमचा 'भेडिया' रिअॅलिटी शोमध्ये जरा जास्तच वाइल्ड झाला (वरुन धवन ला उद्देशून तिने टोला लागवला आहे ) आणि लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला. त्यामुळे अनेक अफवा पसरल्या.'

पुढे ती म्हणाली, काही माध्यमांनी माझ्या लग्नाची तारीख जाहीर करण्याआधीच या अफवांना पूर्णविराम देते. ही अफवा पूर्णतः बेसलेस (कशाचाही आधार नसलेली) आहे. कृपया यावर विश्वास ठेऊ नका".

क्रिती सेनन आणि वरुण धवनने नुकतीच 'झलक दिखला 10'च्या मंचावर हजेरी लावली होती. दरम्यान करणने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत वरुण म्हणाला,"क्रितीचं प्रेम एका वेगळ्याच व्यक्तीवर आहे. जो व्यक्ती सध्या मुंबईत नसून दीपिकासोबत एका सिनेमाचं शूटिंग करत आहे". आणि त्यावरून क्रिती आणि प्रभासच्या नात्याबाबत अफवा उठल्या.

क्रिती सेनन आणि प्रभासचा 'आदिपुरुष' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रभास रामाच्या तर क्रिती जानकीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा पौराणिक शैलितील सिनेमा आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ओम राऊतने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT