Untitled-5.jpg 
मनोरंजन

अभिनेत्री म्हणते, मी शेवटची आंघोळ केव्हा केली आठवत नाही...

वृत्तसंस्था

मुंबई : फेमस अभिनेत्री आणि सिंगर लेडी गागाला रोज आंघोळ करायला आवडत नाही. इतकेच नाही तर तिने शेवटची आंघोळ केव्हा केली आहे, हेही तिला आठवत नाही. खुद्द तिनेच याची कबुली चक्क सोशल मीडियावरच देऊन टाकली आहे. 

सेलिब्रेटी म्हटलं की कामाचा व्याप हा आलाच. अनेकदा या सेलिब्रेटींना त्यांच्या पर्सनल लाइफसाठीही वेळ मिळत नाही. तर अनेकदा त्यांनी काही आठवडे न झोपताही काढावे लागतात. पण हे सर्व करताना त्यांच्या चेहऱ्यावर कामाचा ताण कधीच दिसत नाही. लेडी गागाने आपल्या आंघाेळीबाबत जगजाहीर खुलासा केला आहे. 

लेडी गागानं ट्विट करत याबाबत खुलासा केला आहे. ट्विटमध्ये ती म्हणते, तिला दररोज अंघोळ करायला आवडत नाही. सिनेमा किंवा गाण्यामळे नाही तर लेडी गागा अंघोळीच्या मुद्द्यावरून चर्चेत आली आहे. लेडी गागा आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, मला माझ्या एका सहकाऱ्यानं विचारलं होतं की, तू शेवटची अंघोळ कधी केली होतीस तुला आठवतं का? या प्रश्नावर मला आठवत नाही असं उत्तर मी दिलं. असं ट्विट लेडी गागानं केलं आहे.

सध्या लेडी गागाचं हे ट्विट सोशलवर चर्चेत आहे. सध्या हे ट्विट व्हायरल होताना दिसत आहे. हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.तिचं हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

लेडी गागाच्या ट्विटचं तिचे चाहते खूप कौतुकही करत आहेत तर दुसरीकडे लोकांना असं वाटत आहे की तिनं अलिकडे रिलीज केलेला तिचा 6 वा अल्बम याच कारणानं लवकर लॉन्च झाला. ती कामात एवढी बीझी होती की तिला स्वतःसाठी फार कमी वेळ मिळाला असेल असं तिच्या काही चाहत्यांचं म्हणणं आहे.

लेडी गागाबद्दल बोलायचं तर ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. अत्रंगी ड्रेस आणि त्यांना कॅरी करण्याचा लेडी गागाचा आत्मविश्वास तिला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करतो. ती एक अप्रतिम गायिका आणि कंपोजर आहे. याशिवाय तिनं अभिनय क्षेत्रातही धमाकेदार पदार्पण केलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT