Lata Mangeshkar Death Anniversary
Lata Mangeshkar Death Anniversary esakal
मनोरंजन

Lata Mangeshkar Death Anniversary : लता दीदींच्या नावावर असलेले विक्रम माहितीये? ३६ भाषांमध्ये त्यांनी तब्बल...

युगंधर ताजणे

Lata Mangeshkar Death Anniversary : भारताच्या गानसम्राज्ञी म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या लता दीदींचा चाहतावर्ग (Lata Mangeshkar Latest News) हा केवळ भारतच नाही तर जगभरात आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या आवाजानं चाहत्यांना भारावून टाकले होते. अजूनही त्यांच्या सूरावटीतील ती गाणी ऐकल्यानंतर चाहते मुग्ध होऊन जातात.

आज लता दीदींचा दुसरा पुण्यस्मरण दिन आहे. त्या निमित्तानं आपण (Lata Mangeshkar Latest Marathi News) त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेणार आहोत. लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले. जसे की सर्वाधिक गाणी गाण्याचा, वेगवेगळ्या भाषेत गाणी गाणाऱ्या गायिका, या सारखे अनेक विक्रम दीदींच्या नावावर आहेत. यापैकी त्यांच्या विक्रमाची नोंद गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेक़ॉर्डमध्ये घेतली गेली होती.

वयाच्या ९२ व्या वर्षी दींदींनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर देशभर शोककळा पसरली होती. देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली होती. पंतप्रधान मोदींनी खास पोस्ट शेयर करत दीदींविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. असं म्हटलं जातं की, दीदींनी त्यांच्या करिअरमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायली.

१९४२ मध्ये लता मंगेशकर यांनी त्यांच्या गायन प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी ३६ भाषांमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायली. १९६० पर्यत त्यांनी ३० हजार गाण्यांचे रेकॉर्ड केले होते. त्याचवेळी त्यांची नोंद गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं घेतली होती.

२८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्यप्रदेशातील इंदोर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला होता. त्यांनी त्यांच्या वडिलांकडून गायनाचे धडे घेतले. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी एका मराठी संगीत नाटकामध्ये काम केले होते. दीदींनी हिंदी भाषेतच एक हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. संगीत क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी दीदींना गौरविण्यात आले. १९८९ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते.

१९८९ मध्ये त्यांना पद्मविभुषण तर २००१ मध्ये त्यांना देशाच्या सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. दुसरीकडे फ्रान्स सरकारनं २००७ मध्ये त्यांना ऑफिसर ऑफ द लिजंड ऑफ ऑनरने गौरविले. भारत सरकारनं त्यांना २०१९ मध्ये त्यांच्या ९० व्या जन्मदिनी डॉटर ऑफ द नेशननं सन्मानित केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT