leo twitter review thalapathy vijay sanjay dutt trisha krishnan Esakal
मनोरंजन

Leo Twitter Review: काहींना आवडला तर काहींची नाराजी, विजयचा लिओ सिनेमा कसा आहे? जाणून घ्या

थलापती विजयचा लिओ आज संपूर्ण भारतात रिलीज झालाय

Devendra Jadhav

थलापती विजयचा लिओ सिनेमा आज संपूर्ण भारतात रिलीज झालाय. गेल्या अनेक महिन्यांपासून लिओची उत्सुकता होती. अखेर आज लिओ रिलीज झालाय.

विक्रम, कैथी अशा सिनेमांमधून लोकेश कनगराज एक वेगळंच युनिव्हर्स तयार करत आहे. याच युनिव्हर्सचा पुढचा भाग म्हणजे लिओ. लिओ पाहण्यासाठी आज थिएटरमध्ये सकाळपासून गर्दी होत आहे. कसा आहे लिओ? वाचा ट्विटर रिव्ह्यू

(leo twitter review thalapathy vijay sanjay dutt trisha krishnan)

एका ट्विटर युजरने लिहीलंय की, #LeoReview(हिंदी):⭐⭐⭐⭐⭐5/5.

#Leo चा लेट नाईट शो पाहिला. मी म्हणू शकतो की ही थलापती विजयचा आजवरचा सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे. लिओ सिनेमाचा एकही प्रसंग चुकवण्याची हिंमत करू नका, सर्व दृश्ये या #Leo चा महत्त्वाचा भाग आहेत

एका ट्विटर युजरने अमेरिकेतील शोच्या वेळी असलेल्या रिकाम्या जागांकडे बोट ठेवलंय आणि लिहीलंय, #LeoDisaster व्हायरल झाल्यानंंतर, अनेकांनी यूएसमधील तिकिटे रद्द केली होती. पुढचा प्रीमियर काही मिनिटांवर आहे, पण जागा रिकाम्या आहेत.

अशाही प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. त्यामुळे अनेकांनी लिओ वर फ्लॉपचा शिक्का लावलाय.

एका ट्विटर युजरने कौतुक करत लिहीलंय की, "विजयचा फार मोठा चाहता नाही पण अलीकडच्या काळात मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे लिओ. थरारक, उत्कट आणि 3 तासांचे निखळ मनोरंजन. आवर्जून पहावा असा चित्रपट"

आणखी एका ट्विटर युजरने लिहीलंय की, थिएटरमध्ये प्रथमच तमिळ चित्रपट पाहिला आणि माझा अण्णा अभिनेता विजयने मला निराश केले नाही. लोकेशने आणखी एक उत्कृष्ट नमुना सामूहिक मसाला असलेला सिनेमा सादर केला. कथा vfx आणि विजयची स्क्रीन प्रेझेन्स एकदम आगळीवेगळी होती. आवडला. रेटिंग: 4/5 #LeoReview #Leo

आणखी एका ट्विटर युजरने लिओ बद्दल नाराजी दर्शवत लिहीलंय,

#लिओ: ⭐️⭐️ लिओ = मांजर

||#LeoReview|#LeoFDFS|| लिओने सिंह बनण्याचा प्रयत्न केला 🦁 पण शेवटी मांजर बनला. जोसेफ विजय आणि कलाकारांकडून एक आशादायक आधार आणि काही प्रशंसनीय प्रयत्न असूनही, अंतिम परिणाम निराशाजनक आहे. लोकेश कनगराजचा लिओ अपेक्षेला जागणारा सिनेमा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : जम्मू-पठाणकोट महामार्गाजवळील सहर खड नदीवरील खचला

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT