sahoo and lisa ray 
मनोरंजन

अभिनेत्री लिसा रे चा 'साहो'वर गंभीर आरोप

वृत्तसंस्था

मुंबई : 'बाहुबली'च्या यशानंतर प्रभासच्या चित्रपटाची प्रतिक्षा होती ती 'साहो' या चित्रपटाची. सध्या बॉक्स ऑफिसवर साहो चांगलाच धुमाकूळ घालतोय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'साहो'चे रिव्ह्यू समोर आले आहेत आणि त्याविषयी संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे ने या सिनेमावर चोरीचे गंभीर आरोप केले आहेत. 'साहो' सिनेमात शिलो शिव सुलेमान (Shilo Shiv Suleman) या कलाकाराचं चित्र कॉपी करून सिनेमाच्या एका पोस्टरमध्ये वापरण्यात आल्याचं लिसाचं म्हणणं आहे.

इंस्टाग्राम अंकाउंटवर तिने दोन फोटो शेअर करत एक भली मोठी पोस्टही टाकली आहे. त्यातील एक फोटो हे शिलो यांचं चित्र आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये चित्रपटामधील एक सिन आहे. ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ''आपल्याला पुढे येऊन बोलायला हवं. मोठ्या बजेटच्या निर्मितीमध्ये शिलो यांचं चित्र फेरफार करुन वापरण्यात आलं. ही प्रेरणा नाही, तर खुलेआम चोरी आहे. हे जगात कुठेच मान्य केलं जाणार नाही. या प्रॉडक्शननं मूळ चित्रकाराची परवानगी घेणे किंवा त्याला क्रेडिट देण्याची दखल घेतलेली नाही. हे खूप चुकीचं आहे."

साहो सिनेमातील हे चित्र 'बेबी वॉन्ट यू टेल मी' गाण्यात वापरण्यात आलं आहे. प्रभास आणि श्रद्धा या दोघांवर चित्रित करण्यात आलेला सीन हा मूळ चित्राशी काहीसा मिळता जुळता आहे. या सर्व प्रकरणानंतरही लिसाच्या आरोपांवर साहोच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: फेरारीतून एन्ट्री, हाफ चड्डी अन्... ; Mumbai Indians च्या सराव सत्राला 'अतरंगी' स्टाईलमध्ये पोहोचला हार्दिक पांड्या...

Ashok Kharat Files: ''आमचे 'हे' त्यातले नाहीत!'', अशोक खरातच्या पत्नीने केली नवऱ्याची पोलखोल

Pali News : पालीत पोलिसांचा आदर्श उपक्रम; ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा, सामाजिक ऐक्य दृढ

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

'साहेब! लग्नाला ६० वर्ष झालीत, तरीही माझे हे...'; ८८ वर्षीय पतीविरोधात ८५ वर्षीय महिलेची भलतीच तक्रार, काय घडलं?

SCROLL FOR NEXT