madhuri
madhuri 
मनोरंजन

आजपर्यंत नृत्याच्या माध्यमातून मन जिंकलेल्या माधुरीने आता चाहत्यांवर केली आपल्या आवाजाची जादू

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसमुळे संकटात असलेल्या लोकांच्या मदतीसाठी बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या बड्या स्टार्सनी रविवारी 'आय फॉर इंडिया' या ऑनलाईन कॉन्सर्टमध्ये सहभाग घेतला. या कॉन्सर्टचं नेतृत्व दिग्दर्शक करण जोहर आणि झोया अख्तर यांंनी पार पाडलं. या कॉन्सर्टचा उद्देश होता देशातील कोरोना व्हायरसचा सामना करण्या-या लोकांसाठी रक्कम जमा करणं. त्यासाठी या कॉन्सर्ट दरम्यान डोनेट बटणावर क्लिक करुन इंडिया पेजवर जाऊन पैसे दान करायचे होते. या दरम्यान कोणी गाणं गायलं कोणी डान्स केला तर कोणी मदतीचं आवाहन केलं. यासगळ्यात आपल्या नृत्याने लोकांच्या मनावर राज्य करणा-या बॉलीवूडच्या धकधक गर्लने चक्क गाणं गायलं..

खरंतर माधुरीच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच होता. आय फॉर इंडियासाठी धकधकगर्ल माधुरीने एड शीरनचं 'परफेक्ट' हे गाणं सादर केलं. ब्लॅक आणि व्हाईट लूकमध्ये माधुरी नेहमीसारखीच सुंदर आणि प्रोफेशनल दिसत होती. पण तीने एकटीने हे गाणं सादर नाही केलं तर तिला या गाण्यात साथ दिली मुलगा अरिन याने. अरिनने पण आईसारखीच ब्लॅक अँड व्हाईट थीम केली होती..अरिनने पियानो वाजवत माधुरीला गाण्यात साथ दिली.

माधुरीच्या गोड गळ्यातून निघालेल्या त्या सुरांनी तिचे चाहते वेडे झाले आहेत. माधुरींच हे गाणं तिच्या चाहत्यांनी सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल केलं आहे. 

याआधी देखील माधुरीला अरिनने तिच्या नृत्यात साथ दिल्याचं आपण पाहिलं होतं. माधुरीने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात ती पायात घुंगरु बांधुन कथ्थकचा रियाज करत होती तर सोबतंच मुलगा अरिन तिला तबल्यावर साथ देताना दिसला होता..त्यानंतर अरिननेही आईला फॉलो करत कथ्थक करण्याचा प्रयत्न केला होता.    

madhuri dixit is breaking the internet with her excellent cover of ed sheerans perfect  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT